नाशिक : जिल्ह्यातील बाजार समित्यांचा बिगुल वाजला, दोन टप्प्यांत निवडणुका
नाशिक : पुढारी वृत्तसेवा
जिल्ह्यातील 14 बाजार समितीच्या निवडणुकांसाठी दोन टप्प्यांत मतदान प्रक्रिया राबविली जात आहे. पहिल्या टप्प्यात 28 एप्रिल रोजी नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत, नाशिक, घोटी, येवला, मालेगाव, चांदवड, देवळा, कळवण, सुरगाणा, दिंडोरी, सिन्नर, नांदगाव या बाजार समित्यांसाठी मतदान होईल. 29 एप्रिलला या बाजार समित्यांची मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे.
दुसऱ्या टप्प्यात लासलगाव आणि मनमाड बाजार समितीसाठी 30 एप्रिल रोजी मतदान होणार असून, त्याच दिवशी मतमोजणी होणार आहे. सहकार प्राधिकरणाने दिलेल्या आदेशान्वये मतदान घेतले जाणार असून, निवडणुकांसाठी निवडणुकी अधिकारी यांची नियुक्तीदेखील केल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक डाॅ. सतीश खरे यांनी दिली.
संपूर्ण जिल्ह्यासह राज्याचे विशेषतः शेतकऱ्यांचे लक्ष लागलेल्या राज्यातील 286 कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा बिगुल अखेर वाजला आहे. सहकार प्राधिकरणाने निवडणुकांचा कार्यक्रम घोषित केला. नाशिक जिल्ह्यात 14 बाजार समित्यांसाठी निवडणूक होत आहे. महत्त्वाच्या असलेल्या नाशिक आणि पिंपळगाव बाजार समितीसाठी पहिल्या टप्प्यात 28 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. याशिवाय घोटी, येवला, मालेगाव, चांदवड, देवळा, कळवण, सुरगाणा, दिंडोरी, सिन्नर, नांदगाव या बाजार समित्यांसाठी 28 एप्रिलला मतदान होईल. 29 एप्रिलला या बाजार समित्यांची मतमोजणी प्रक्रिया होईल.
अशी होणार प्रक्रिया
– अर्ज दाखल २७ मार्च ते ३ एप्रिल
– अर्ज छाननी ५ एप्रिल
– उमेदवारी जाहीर ६ एप्रिल
– अर्ज माघारी २० एप्रिल
– अंतिम उमेदवारी, चिन्ह वाटप २१ एप्रिल
– पहिला टप्पा मतदान २८ एप्रिल
– पहिला टप्पा मतमोजणी २९ एप्रिल
-दुसरा टप्पा मतदान ३० एप्रिल
-दुसरा टप्पा मतमोजणी ३० एप्रिल
हेही वाचा :