पाथर्डी : स्त्री शक्तीचा गौरव, महिलांचा सन्मान सुनीता दौंड | पुढारी

पाथर्डी : स्त्री शक्तीचा गौरव, महिलांचा सन्मान सुनीता दौंड

पाथर्डी तालुका; पुढारी वृत्तसेवा : स्त्री शक्तीचा गौरव, महिलांच्या आत्मसन्मानाची गोष्ट आहे. समाजाच्या प्रगतीमध्ये महिलांचे कायम योगदान असल्याचे प्रतिपादन माजी सभापती सुनीता दौंड यांनी केले. दैत्यनादूरच्या जय भगवान युवा प्रतिष्ठानतर्फे महिलांना पुरस्काराचे वितरण करण्यात आले.

जिल्हा परिषद सदस्या राणी लंके, हर्षदा काकडे, हिरकणी महिला प्रभाग संघाच्या सचिव रंजना सावंत, सरपंच अनुसया दहिफळे, संजीवनी दौंड, भगवान गडाचे विश्वस्त पांडुरंग आंधळे, रामदास महाराज दराडे, किसन आव्हाड, विमल देशुमख, रुख्मिणी नरसाळे आदी उपस्थित होत्या.

सन्मानित केलेले स्फूर्तीदायिनी महिला मंडळाच्या अध्यक्षा मनीषा घुले, संगीता सांगळे, जयश्री कीर्तने, वनिता पालवे, संगीता कावळे, रोहिणी साबळे, ज्योती अधाट, अनिता काटकर, संघर्ष महिला गृप, सरस्वती महिला बचत गट, आदर्श महिला बचत गट आदींचा गौरव करण्यात आला.

राणी लंके म्हणाल्या, स्त्री शक्तीचा सन्मान घराघरात होऊन महिलांनी मुली नको व मुलगा हवा असा अट्टाहास करू नये. मुलगी लक्ष्मीचे रूप आहे, तिची पूजा व्हावी. हर्षदा काकडे म्हणाल्या, महिलांनी राजाकरण व समाजकारणात महत्त्वाची भूमिका बजवावी. नारीशक्तीला सन्मान द्या. तिने केलेल्या चांगल्या कार्याचा गौरव करा.

रंजना सावंत म्हणाल्या, जय भगवान प्रतिष्ठानने महिलांचा केलेला गौरव हा कौतुकास्पद आहे. उमेद अभियानातून महिलांना आत्मनिर्भर होण्यासाठी बचतगटांच्या माध्यमातून काम सुरू आहे. अध्यक्ष आदिनाथ दहिफळे यांनी प्रास्ताविक केले. आरिफ बेग यांनी सूत्रसंचालन केले.

Back to top button