Onion News : जगभरात कांद्याला प्रचंड मागणी तर देशात फेकण्याची वेळ | पुढारी

Onion News : जगभरात कांद्याला प्रचंड मागणी तर देशात फेकण्याची वेळ

नाशिक (लासलगाव) : राकेश बोरा

घसरलेल्या कांदा दराने त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांनी पंतप्रधान यांना कांदा पोस्टाने पाठवला, कांद्याची होळी, इच्छा मरण, गाव विकणे, रस्त्यावर कांदा ओतून तर गळ्यात कांद्याच्या माळा घालून तर कांद्याला अग्नी डाग, अशा एक ना अनेक प्रकारे शेतकरी आपला राग व्यक्त करत आहे. सध्या देशभरात सगळ्यात जास्त चर्चा कांदा दरावरून चर्चा होताना दिसत आहे. जगभरात कांद्याला प्रचंड मागणी आहे. अनेक देशात तर कांद्याचे दर हे गगनाला भिडले आहे अन् भारतात कांदा रस्त्यावर फेकण्याची वेळ आली आहे.

जगभरात कांद्याला प्रचंड मागणी आहे अनेक देशात तर कांद्याचे दर हे गगनाला भिडले आहे. पाकिस्तानमध्ये लोकांना एक किलो कांद्यासाठी 200 रुपये खर्च करावे लागतात. त्याचप्रमाणे फिलिपाइन्समध्ये एक किलो कांद्याची किंमत भारतीय चलनात 3500 रुपयांवर गेली आहे. दक्षिण कोरियात तर एक किलो कांद्याची किंमत 250 रुपये आहे. अमेरिकेत 240 रुपये आणि तैवानमध्ये 200 रुपये किलोने कांदा विकला जात आहे. कांद्याने जपानमध्येही लोकांना रडवले आहे. येथेही एक किलो कांद्यासाठी लोकांना २०० रुपये मोजावे लागत आहेत. त्याचबरोबर कॅनडामध्येही एक किलो कांद्याचा दर 150 रुपयांवर गेला आहे. दुसरीकडे, भारतामध्ये या उलट परिस्थिती उदभवली आहे. भारतात तर घाऊक बाजारात पाच ते सात रुपये किलोने कांदा विकला जात आहे. अशा परिस्थितीत शेतकर्‍यांचा खर्चही वसूल होत नाही. मिळणाऱ्या दरातून वाहतुकीचा खर्चही निघत नसल्याचे भयाण वास्तव्य भारतात आहे.

कांदा दरात सुधारणा होण्यासाठी केंद्र सरकारने प्रथमच लाल कांद्याची नाफेड मार्फत खरेदी सुरू केली आहे मात्र या खरेदीने भावात खूप काही सुधारणा होईल, असे चित्र सध्या तरी दिसत नाही. नाफेडच्या खरेदीवरून केंद्रीय राज्य मंत्री भारती पवार यांनाही शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. सध्या महाराष्ट्र बरोबर इतर राज्यातही कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे. त्या तुलनेत नाफेडमार्फत होणारी खरेदी अगदीच नगण्य असल्याने याचा खूप काही फायदा शेतकऱ्यांना होईल असे सध्या तरी वाटत नाही.

लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दररोज लाल कांद्याची ३० ते ३५ हजार क्विंटल ची आवक होत असून या कांद्याला कमीत कमी ४०० सरासरी ७६० तर जास्तीत जास्त १२०० रुपये प्रति क्विंटल भाव मिळत आहे.

पाच वर्षातील कांदा आवक आणि बाजारभाव

 सन २०१८-१९

६४ लाख ३४ हजार ७२८– किमान १०० सरासरी ८७० कमाल २१०२

सन २०१९-२०

५९ लाख ९४ हजार २०७–किमान १०० सरासरी ३११० कमाल १११११

सन २०२०-२१

६३ लाख ४४ हजार ६५८—किमान २०० सरासरी २६९० कमाल ६५००

सन २०२१-२२

८५ लाख ३४ हजार २६१—-किमान २२५ सरासरी १६४८ कमाल ३६५२

सन २०२२-२३

७२ लाख ६५ हजार २१७—किमान ४०० सरासरी ७६० कमाल

हेही वाचा :

Back to top button