नगर : देहर्‍यातील यात्रेत दोघांवर जीवघेणा हल्ला | पुढारी

नगर : देहर्‍यातील यात्रेत दोघांवर जीवघेणा हल्ला

वाळकी : पुढारी वृत्तसेवा : गावच्या जत्रेत किरकोळ कारणावरून दोघा युवकांवर कोयत्याने तसेच कुदळीने जीवघेणा हल्ला करण्यात आला. ही घटना नगर तालुक्यातील देहरे गावात मंगळवारी (दि.7) दुपारी घडली. या हल्ल्यात जखमी झालेल्या दोघा युवकांवर नगरच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून, दोघा हल्लेखोरांना पोलिसांनी अट केली. याबाबत राजेंद्र शिवाजी लांडगे (वय 41, रा.लांडगे वस्ती ,देहरे ता.नगर) यांनी एम.आय.डी.सी. पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. मंगळवारी (दि.7) देहरे गावात ग्रामदैवतांचा वार्षिक यात्रोत्सव होता. यात्रेत दुपारी 3.30 वाजता रेल्वे टपरीजवळ रस्त्यावर घड्याळ विक्रेत्यास आकाश शिवाजी जाधव हा त्याचा एक अनोळखी पाहुणा (नाव माहित नाही) हे दमदाटी करीत होते.

त्यांना फिर्यादीचा पुतण्या ऋषिकेश संजय लांडगे व त्याचा मिञ विशाल ज्ञानदेव करांडे व अन्य दोन-तीनजणांनी घड्याळ विक्रेत्यास का दम देत आहात? अशी विचारणी केली. त्यावरून आरोपी आकाश शिवाजी जाधव (रा. देहरे, ता.नगर) याने व त्याचा एक अनोळखी व्यक्तिने शिवीगाळ करुन कोयता व कुदळ घेऊन ऋषिकेश लांडगे यास कुदळीने उजव्या हातावर तसेच पुतन्याचा मिञ विशाल करांडे यास आकाशसोबत आलेल्या अनोळखी व्यक्तिने मारहाण केली. आकाश जाधव याने कोयत्याने पाठीवर वार करुन त्या दोघांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. असे फिर्यादीत म्हंटले आहे. यावेळी जखमी दोघा युवकांना उपचारासाठी नगरला हलविण्यात आले. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी आकाश जाधवसह दोघांवर गुन्हा दाखल केला.पोलिस उपनिरीक्षक चांगदेव हंडाळ यांच्यासह पथकाने दोघा आरोपींना अटक केली.

Back to top button