नाशिकच्या निओ मेट्रो प्रकल्पाचे दिल्लीत सादरीकरण | पुढारी

नाशिकच्या निओ मेट्रो प्रकल्पाचे दिल्लीत सादरीकरण

नाशिक: पुढारी वृत्तसेवा

मेट्रो निओचे बुधवारी (दि. १५) महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश मिश्रा यांनी पीएमओ कार्यालयाच्या सचिवांसमोर सादरीकरण करत मेट्रोचा सविस्तर प्रकल्प आराखडा पीएमओ कार्यालयाकडे सुपूर्द केला. पीएमओ कार्यालयाकडून या प्रस्तावाचा तसेच आराखड्याचा अभ्यास केला जाणार आहे. आराखडा अंतिम मान्यतेसाठी मंत्रीमडळ बैठकीत सादर केला जाईल.

नाशिकमध्ये भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीचा समारोपाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेट्रो प्रकल्प लवकरच मार्गी लागेल, असे सांगितले होते. आपल्या देशात पारंपरिक आणि कन्व्हर्टेबल अशा दोनच प्रकारच्या मेट्रो असाव्यात, अशी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले होते. देशभरात एकाच प्रकारचा मेट्रो प्रकल्प उभारला जावा आणि हा प्रकल्प मेक इन इंडिया असला पाहिजे व सर्व सुटे भाग आपल्या देशातच तयार व्हावेत, असा पंतप्रधानांचा आग्रह असल्यामुळे हा प्रकल्प थांबला होता. परंतु फडणवीस यांनी दिल्ली दरबारी आपले राजकीय वजन वापरत नाशिकच्या मेट्रो निओ प्रकल्पाला उशीरा का होईना, चाल दिली आहे. यावेळी पीएमओ कार्यालयात निओ मेट्रोचा डीपीआर सादर करताना बुधवारी (१५) महामेट्रोचे सुनिल माथूर तसेच आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी मेट्रो निओच्या सचिवांसह अधिकाऱ्यांसमोर सादरीकरण केले.

हेही वाचा :

Back to top button