पुणे : पाणीपट्टीची थकबाकी न भरल्यास कारवाई | पुढारी

पुणे : पाणीपट्टीची थकबाकी न भरल्यास कारवाई

पुणे; पुढारी वृत्तसेवा : व्यावसायिक वापरासाठी महापालिकेकडून दिल्या जाणार्‍या पाण्याची थकबाकी 70 कोटी रुपये असल्याने महापालिकेने थकबाकी वसुलीसाठी कारवाईचा निर्णय घेतला आहे. 15 दिवसांत थकबाकी न भरल्यास कठोर कारवाई करण्याचा इशारा महापालिकेने दिला आहे. पुणे महापालिका, पुणे छावणी परिषद व खडकी छावणी परिषद क्षेत्रातील व्यावसायिक वापर करणार्‍यांसाठी म्हणजेच व्यावसायिक आस्थापना (हॉटेल व्यावसायिक, आयटी क्षेत्रासह), शासकीय, निमशासकीय व केंद्र शासनाची विविध कार्यालये यांना पाणीपुरवठा मीटर विभागाच्यामार्फत पाणी वितरणाची नोंद होते.

या विभागाकडून पाणीपुरवठ्याची बिले दर दोन महिन्यांनी संबंधितांना पाठविली जातात. थकबाककी वसूल करण्यासाठी पाणीपुरवठा खात्याने पुणे महापालिकेसाठी स्वतंत्र कार्यकारी अभियंता यांची नेमणूक केली आहे, असे पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख अनिरुध्द पावसकर यांनी सांगितले. थकबाकीदारांनी पुणे पालिकेच्या लष्कर पाणीपुरवठा विभाग, स्वारगेट पाणीपुरवठा विभाग, एसएनडीटी पाणीपुरवठा विभाग येथे संपर्क साधून थकबाकी भरावी. माहिती घेण्यासाठी 8888251001 या व्हॉट्सअप क्रमांकावर मेसेजद्वारे पाणीपुरवठा विभागाशी संपर्क साधता येईल.

Back to top button