नाशिक : नोकरदार महिलांवर अत्याचार, खासगी कंपनीतील चौघा वरिष्ठांविरोधात गुन्हा | पुढारी

नाशिक : नोकरदार महिलांवर अत्याचार, खासगी कंपनीतील चौघा वरिष्ठांविरोधात गुन्हा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

शहरात नोकरदार महिलांवर वरिष्ठांकडून अत्याचार व विनयभंग झाल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. त्या प्रकरणी मुंबई नाका पोलिस ठाण्यात विनयभंग व बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पहिल्या घटनेत वरिष्ठ अधिकाऱ्याने पीडितेवर अत्याचार करीत जीवे मारण्याची धमकी दिली. पीडितेने दिलेल्या फिर्यादीनुसार, मुंबई नाका येथील स्टार हेल्थ ॲड अलाइड इन्श्युरन्स कंपनीत एरिया मॅनेजर असलेल्या नीलेश अनिल कदम याने अत्याचार केला. संशयित नीलेश याने २१ मार्च २०२१ ते १८ डिसेंबर २०२२ या कालावधीत पीडितेवर वारंवार अत्याचार केला. तिच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी देत मारहाणही केली. फेब्रुवारी महिन्यात पीडिता कंपनीचा राजीनामा देण्यासाठी गेली असता संशयिताने पीडितेबाबत अफवा पसरवल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी मुंबई नाका पोलिस तपास करीत आहेत.

दुसरी घटना एनराजय बाय सयाजी हॉटेल येथे ८ डिसेंबर २०२२ ते १३ फेब्रुवारी २०२३ दरम्यान, घडली. पीडितेच्या फिर्यादीनुसार, हॉटेलमधील बॅन्क्वेट सेल्स मॅनेजर उज्ज्वल दिंडे, जनरल मॅनेजर अमर पाटील यांनी पीडितेसोबत जवळीक साधण्याचा प्रयत्न करून तिला मद्यसेवन करण्यास जबरदस्ती केली. तर तिसरा संशयित भूषण मिश्री याने पीडितेस कार्यालयात बोलावून दमदाटी करीत अश्लील इशारे केले, तसेच आमचे न ऐकल्यास नोकरीवरून काढून टाकण्याची व नाशिकमध्ये राहू देणार नाही, अशी धमकीही दिली. त्यामुळे पीडितेने संशयित उज्ज्वल दिंडे, अमर पाटील व भूषण मिश्री या तिघांविरोधात विनयभंगाची फिर्याद दाखल केली असून, पोलिस तपास करीत आहेत.

हेही वाचा : 

Back to top button