Mahashivratri 2023 : 108 बेलपत्रांसाठी मोजा ‘इतके’ रुपये, महाशिवरात्रीनिमित्त वाढली मागणी | पुढारी

Mahashivratri 2023 : 108 बेलपत्रांसाठी मोजा 'इतके' रुपये, महाशिवरात्रीनिमित्त वाढली मागणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

महादेवाला बेलाचे पान प्रिय असल्यामुळे महाशिवरात्रीनिमित्त बाजारात बेलपत्राला मागणी वाढली आहे. पूर्वी वाट्याने मिळणारा बेल त्यासोबत फूल मिळणे हे आता दुर्मीळ होत असून बेलाची १०८ पाने घ्यायची असतील, तर ५० ते ६० रुपये मोजावे लागत आहेत.

पौराणिक कथेनुसार शंकराच्या तीन नेत्रांचे प्रतीक म्हणून तीन पानांचा बेल वाहिला जातो. बेलाचे पान, झाड, फळ आयुर्वेदिक असल्यामुळे त्याच्यात औषधी गुणधर्म मोठ्या प्रमाणात असतात.

बेलाचे झाड झाले दुर्मीळ

वाढत्या शहरीकरणामुळे बेलाच्या झाडांची संख्या कमी झाली आहे. महाशिवरात्र, हरतालिका, श्रावण, प्रदोष, साेमवार या काळात बेलाच्या पानांना अधिक मागणी असते. याकाळात शहरात ज्याठिकाणी बेलाची झाडे उपलब्ध आहेत तिथून बेलाची पाने आणून फूलविक्रेते बाजारात विकतात. त्यानंतर झाडांची काळजी घेतली जात नाही. त्यामुळे बेलाच्या झाडांची संख्या शहरात कमी झालेली दिसून येत आहे.

फुलांना वाढली मागणी

दररोजच्या पूजेला व येणाऱ्या शिवरात्रीनिमित्त शेवंती, निशिगंधा, झेंडू फुलांना मागणी वाढली आहे. निशिगंधा २४० रुपये किलो, तर पिवळी, गुलाबी, पांढरी शेवंती १६० रुपये किलोने फूल बाजारात मिळत आहे.

बेलाच्या झाडाला सुरुवातीच्या काळात वाढ कमी असते. हल्ली लोक ज्या झाडांची वाढ लवकरात लवकर होते त्याच झाडांची लागवड अधिक प्रमाणात करतात. त्यामुळे बेलाची लागवड आवड म्हणून केवळ बंगला, परसबागेत केली जाते.

-शेखर गायकवाड (पर्यावरणप्रेमी)

हेही वाचा :

Back to top button