नाशिक पदवीधर निवडणूक : मतदान करण्यासाठी लागल्या रांगा | पुढारी

नाशिक पदवीधर निवडणूक : मतदान करण्यासाठी लागल्या रांगा

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क 

नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी आज (दि. ३०) विभागातील पाचही जिल्ह्यांत सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत मतदान घेण्यात येत आहे. विभागात २ लाख ६२ हजार ७३१ पदवीधर मतदार असून १६ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे.

राज्यात नाशिक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक सर्वांधिक चर्चेत राहिली. त्यात आज मतदानाचा दिवस उजाडला असून सकाळी 8 वाजेपासूनच मतदानाला सुरुवात झाली आहे. नाशिक जिल्ह्यात ९९ मतदान केंद्रे आहेत. ठिकठिकाणी मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी मतदारांच्या रांगा लागल्या आहेत. सकाळी 8 ते 10 या वेळेत विभागात 6.52% तर नाशिक जिल्ह्यात 5.49% मतदान झाले आहे. निवडणुकीत प्रचारासाठी सोळाही उमेदवारांनी मागील १५ दिवसांपासून पाचही जिल्हे पिंजून काढले. त्यामुळे मतदारांचा कौल महत्वाचा ठरणार आहे.

विभागातील एकूण ३३८ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. यावेळी विभागात पदवीधर मतदारांची संख्या २ लाख ६२ हजार ७३१ इतकी आहे. सर्वाधिक मतदार हे नगर जिल्ह्यातील असून, त्यांची संख्या १ लाख १५ हजार ६३८ आहे. त्याखालोखाल नाशिकमध्ये ६९ हजार ६५२, जळगावला ३५ हजार ५८, धुळ्यात २३४१२, तर नंदुरबारमध्ये १८९७१ मतदार आहेत. हे सर्व मतदार आज मतदानाचा हक्ला बजावणार आहेत.

 

हे उमेदवार आहेत रिंगणात

रतन बनसोडे, सुरेश पवार, अनिल तेजा, अन्सारी रईस अहमद अब्दुल कादीर, अविनाश माळी, इरफान मो इसहाक, ईश्वर पाटील, बाळासाहेब घोरपडे, ॲड. जुबेर नासिर शेख, ॲड. सुभाष जंगले, सत्यजित तांबे, नितीन सरोदे, पोपट बनकर, शुभांगी पाटील, सुभाष चिंधे, संजय माळी.

हेही वाचा :

Back to top button