नगर : दुचाकीला पिकअपची धडक बसून शाळकरी मुलगी ठार | पुढारी

नगर : दुचाकीला पिकअपची धडक बसून शाळकरी मुलगी ठार

पारनेर :  पुढारी वृत्तसेवा : चोंभूत येथील आठ वर्षाच्या स्वराली महादेव खांडेकर हिचा दुचाकीवरून जात असताना अपघाती मृत्यू झाला. म्हस्केवाडी येथील बहिरोबावाडी येथे बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी जात असताना म्हस्केवाडी कालव्याजवळील वळणावर दुचाकीला अपघात घडला. स्वरालीचे वडील महादेव खांडेकर यांच्या दुचाकीला भरधाव पिकअपने धडक दिल्याने स्वराली खांडेकर हिचा जागीच मृत्यू झाला.

पिकपचालक फरार झाला असून, त्याचा शोध पोलिस घेत आहेत. दरम्यान, अपघाताची माहिती दत्तात्रेय म्हस्के व ग्रामपंचायत सदस्य प्रणल भालेराव यांनी पोलीस निरीक्षक घनश्याम बळक यांना दिली. स्वराली दरेकर वस्ती शाळेत इयत्ता तिसरीत शिक्षण घेत होती. नुकताच जिल्हास्तरीय बालचित्रकला स्पर्धेत तिसरा क्रमांक मिळाला होता. तिला एक भाऊ असून आई-वडील शेतीकाम करतात. तिच्या जाण्याने हळहळ व्यक्त होत आहे.

Back to top button