Pathaan World Wide BO Collection : 'पठान'चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, ५५० कोटींचा गल्ला | पुढारी

Pathaan World Wide BO Collection : 'पठान'चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, ५५० कोटींचा गल्ला

पुढारी ऑनलाईन डेस्क : ‘पठान’ने धुवॉधार ओपनिंग करून अनेक मोठे रेकॉर्ड ब्रेक केले आहेत. (Pathaan World Wide BO Collection) पठान हिंदी सिनेमा जगतातील सर्वात मोठा ओपनर चित्रपट ठरला आहे. पठान रिलीज होऊन ५ दिवस झाले आहेत. आतापर्यंत या चित्रपटाने वर्ल्ड वाईड कलेक्शनमध्ये ५५० कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. (Pathaan World Wide BO Collection)

पठानची धुवॉधार कमाई

पठानने या वीकेंडला दमदार कमाई करत वर्ल्डवाईड ५५० कोटींचा आकडा गाठलाय. ट्रेड ॲनालिस्ट रमेश बाला यांच्या माहितीनुसार, पठानने रविवारी २९ जानेवारी रोजी जवळपास ७० कोटींची कमाई करून पुन्हा इतिहास रचला आहे.

५ दिवसात ५५० कोटींचा आकडा पार

रविवारी सुट्टीच्या दिवशीही पठानला भरपूर फायदा मिळाला. जगभरात पठानची चर्चा आहे. रमेश बाला यांनी ट्विट करून म्हटलं होतं की, पठानचे वर्ल्डवाईड ग्रॉस कलेक्शन पाचव्या दिवशीही ५५० कोटी रुपयांपर्यंत गाठेल. केवळ ५ दिवसांत ५५० कोटींची कमाई करणे खूप मोठी बाब आहे.

शाहरुख खानचं बॉलीवूडचा रिअल बादशाह असल्याचे सिद्ध झाले आहे. दीर्घकाळानंतर साहरुखने पडद्यावर वापसी केली आणि बॉलिवूडला मोठा हिट चित्रपट दिला. त्याचे अधिकतर चित्रपट फ्लॉप होत होते. चित्रपटांना प्रेक्षक मिळायचे नाहीत. पण, आता चित्र पालटलेले दिसत आहे.

पठानची दमदार कमाई

ट्रेड ॲनालिस्ट रमेश बाला यांच्या माहितीनुसार, पठानने रविवारी भारतात ७० कोटींचं जादुई कलेक्शन केलं आहे. पठानच्या हिंदी व्हर्जनने बुधवारी ५५ कोटी, गुरुवारी ६८ कोटी, शुक्रवारी ३८ कोटी, शनिवारी ५१.५ कोटी कमावले.

Back to top button