नाशिक : महाराष्ट्र पत्रकार संघ जिल्हाध्यक्षपदी ‘दै.पुढारी’चे प्रतिनिधी सचिन बैरागी | पुढारी

नाशिक : महाराष्ट्र पत्रकार संघ जिल्हाध्यक्षपदी ‘दै.पुढारी’चे प्रतिनिधी सचिन बैरागी

नांदगाव : पुढारी वृत्तसेवा

महाराष्ट्र पत्रकार संघाच्या जिल्हाध्यक्षपदी दै. ‘पुढारी’चे नांदगाव तालुका प्रतिनिधी सचिन बैरागी यांची फेरनिवड करण्यात आली. संघाचे राज्य अध्यक्ष विलासराव कोळेकर यांनी ऑनलाइन पद्धतीने ही निवड जाहीर केली. यावेळी संघाच्या राज्यभरातील तसेच नाशिक जिल्ह्यातील पदाधिकार्‍यांची निवड जाहीर करण्यात आली. बैरागी यांची जिल्हाध्यक्षपदावर ही सलग चौथ्यांदा निवड झाली. जिल्हा कार्यकारिणीत जिल्हा उपाध्यक्ष बापूसाहेब चव्हाण, जिल्हा सरचिटणीस गजानन देशमुख, जिल्हा सचिव किरण काळे, जिल्हा संघटक राजेंद्र तळेकर, जिल्हा संपर्कप्रमुख किरणकुमार आवारे, जिल्हा सल्लागार नीलेश दायमा यांची निवड झाली.

हेही वाचा:

Back to top button