जळगाव दूध संघाची निवडणूक वेळेवरच होणार; शासनाचे आदेश | पुढारी

जळगाव दूध संघाची निवडणूक वेळेवरच होणार; शासनाचे आदेश

जळगाव : पुढारी वृत्तसेवा

जळगाव जिल्हा सहकारी दूध संघाच्या निवडणुकीला अचानक काही दिवसांसाठी स्थगिती देण्यात आली. मात्र, शुक्रवारी (दि.2) राज्य सरकारने पुन्हा नवीन अध्यादेश काढला आहे. त्यानुसार दूध संघाची स्थगित झालेली निवडणूक प्रक्रिया वेळेवरच होणार आहे.

राज्यात ग्रामपंचायत निवडणुका होऊ घातल्या आहे. ग्रामपंचायत आणि सहकारी संस्थांच्या निवडणुकांचे कार्यक्षेत्र ग्रामीणभाग असल्याने अनेक मतदार मतदानापासून वंचित राहण्याची शक्यता लक्षात घेता, दूध संघाच्या संचालकपदाच्या निवडणुकांची प्रक्रिया शासनाने स्थगित केली होती. शनिवारी (दि.१०) होणारी निवडणूक मंगळवार (दि.२०) पर्यंत स्थगित करण्यात आली होती. भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत निवडणूक वेळेवर घेण्याची विनंती केली. याबाबतचे आदेश शुक्रवारी (दि.2) समोर आले असून या आदेशानुसा दि. २९ नोव्हेंबर रोजी ज्या टप्प्यावर निवडणूक थांबवण्यात आली. तेथूनच पुढे निवडणूक प्रक्रिया सुरु करण्यास मान्यता देण्यात येत असल्याचे म्हटले आहे. महाराष्ट्राचे कार्यकारी अधिकारी अनिल जे. चौधरी यांच्या स्वाक्षरीचे आदेश असून शासनाच्या नव्या आदेशानुसार शनिवारी (दि.१०) रोजीच मतदान होणार आहे.

हेही वाचा:

Back to top button