औरंगाबाद : गंगापूर येथील चोरीप्रकरणी दोघांना अटक; गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई | पुढारी

औरंगाबाद : गंगापूर येथील चोरीप्रकरणी दोघांना अटक; गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई

गंगापूर, पुढारी वृत्तसेवा : येथील शिवाजी चौकातील एका मोबाईल दुकानात काही दिवसापूर्वी चोरी झाली होती. या प्रकरणातील दोघा आरोपींना आज गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने संगमनेर येथून ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ५८ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, गंगापूर येथील शिवाजी चौक येथे अजीम अब्दुल रहिम कुरेशी यांचे मोबाईलचे दुकान आहे.  ४ नोव्हेंबरला चोरट्यांनी या मोबाईल शॉपीचे छतावरील पत्रे उचकाटून ५८ हजार ३५० रुपये किंमतीचे ७५ मोबाईल हेडसेट चोरट्याने चोरून नेले. शहरातील एका मोबाईल शॉपीत हे मोबाईल हेडसेट असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. त्यानुसार त्या मोबाईल शॉपीचे मालक अमजद उमर पठाण चौकशी केली असता दत्ता सिताराम गोसावी (रा. दिल्ली नाका, संगमनेर) याने हे मोबाईल हेडसेट दिल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर ते चोरीचे मोबाईल हेडसेट जप्त करत पोलिसांनी दत्ता गोसावी याच्यासह अमजद पठाण याला ताब्यात घेतले. व त्यांच्यावर गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

ही कामगिरी पोलीस अधीक्षक, श्री. मनिष कलवानीया, अपर पोलीस अधीक्षक सुनिल लांजेवार, यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रामेश्वर रेंगे, पोउपनि प्रदीप डूबे, पोना दिपक सुरोशे, पोकों रामेश्वर धापसे, ज्ञानेश्वर मेटे, राहूल गायकवाड, आनंद घाटेश्वर, योगेश तरमाळे, जिवन घोलप, संजय तांदळे यांनी केली.

   हेही वाचलंत का ?

 

Back to top button