नाशिक : आरोग्य कंत्राटी कर्मचारी वेतनविना | पुढारी

नाशिक : आरोग्य कंत्राटी कर्मचारी वेतनविना

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
जिल्हा शासकीय रुग्णालयात कंत्राटी पद्धतीने काम करणार्‍या 36 सफाई कामगार सहा महिन्यांपासून विनावेतन काम करीत आहेत. ठेकेदाराने गेल्या जून महिन्यापासून वेतन दिले नसल्याने या कामगारांसमोर आर्थिक संकट आहे. तर, दुसरीकडे नवीन ठेकेदार नेमण्याची प्रक्रिया सुरू आहे.

आरोग्य विभागाच्या एनआरएचएमच्या माध्यमातून जिल्हा रुग्णालयात 36 सफाई कामगारांची भरती करण्यात आली होती. यापैकी 21 सफाई कामगार हे बाल कक्षात तर, 15 कर्मचारी हे नवजात बालकाच्या अतिदक्षता (एसएनसीयू) विभागामध्ये कार्यरत आहेत. दोन ठेकेदारांच्या मार्फत सफाई कामगारांची भरती करण्यात आली आहे. त्यांना 14 हजार 500 रुपयांचे वेतन ठरलेले असताना ठेकेदारामार्फत मात्र सात हजारच वेतन अदा केले जाते. त्यामुळे वेतनाचा वाद कामगार न्यायालयातही गेला आहे. दरम्यान, जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागास ठेकेदाराकडून वेतनाची माहिती उपलब्ध करून दिल्यानंतर वेतन अदा केले जाते. संबंधित ठेकेदारांनी गेल्या मे महिन्यात सफाई कामगारांना वेतन दिले असून, त्यानंतर वेतन प्रलंबित आहेत. याबाबत संबंधित कामगारांनी वरिष्ठांकडे थकीत वेतनाबाबतची मागणीही केली आहे. मात्र, त्यांच्या या मागणीकडे गांभीर्याने कोणीही पाहत नाही.

हेही वाचा:

Back to top button