धुळे : कासारे ग्रामस्थांसाठी शुध्द पिण्याच्या पाण्याचे दोन संचाचे लोकार्पण

पिंपळनेर : पुढारी वृत्तसेवा
कासारे ग्रामपंचायत लोकनियुक्त सरपंच विशाल बापू देसले यांच्या प्रयत्नातून जिल्हा नियोजन विभाग नावीन्यपूर्ण योजनेअंतर्गत गावातील वार्ड नंबर १, २ व ३ साठी बालाजी मंदिराजवळ व वार्ड नंबर ४, ५ व ६ साठी बसस्टॅन्डजवळ शुद्ध थंड पिण्याच्या पाण्याची सोय करून देण्यात आली आहे. त्याचे लोकार्पण करून प्रभागातीलच महिलांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

ग्रामस्थांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या या थंड पाण्याकरीता एका तासाला २ हजार लिटर शुद्ध थंड पाणी तयार करणारे मशीन बसविण्यात आले आहे. त्यासाठी ग्रामस्थांना पाण्याचे कार्ड वाटप करून केवळ ५ रुपयात २० लिटर मिळणार आहे. तसेच ज्या ग्रामस्थांनी चालू वर्षाची घरपट्टी आणि पाणीपट्टी भरणा केला आहे. त्यांना २० लिटर पाण्याचा जार देखील मोफत देण्यात येणार असल्याची घोषणा सरपंच विशाल देसले यांनी यापूर्वीच केलेली आहे. पाणी योजेनेच्या लोकार्पणप्रसंगी ज्येष्ठ मार्गदर्शक अशोक नाना खैरनार, अशोक दादा देसले, दिलीप बापू काकूस्ते, राजेंद्र बापू देसले, सुभाष आबा देसले, सुधाकर अण्णा सोनवणे, आबासाहेब नांद्रे, ग्रामपंचायत सदस्य दीपक चौधरी, रवींद्र चव्हाण, विलास सोनवणे, तंटामुक्ती अध्यक्ष दिपक देसले, पोलीस पाटील दिपक काकूस्ते, कासारे विविध कार्यकारी सोसायटीचे नवनिर्वाचित संचालक सुरेश देसले, सुरेश सीताराम देसले, राजेंद्र देसले, नामदेव अप्पा देसले, शिवाजी देसले, अविनाश खैरनार, सुनील खैरनार, सुभाष निकवाडे, चंद्रकांत काकूस्ते, विशाल देसले व संचालक मंडळ तसेच वार्डातील प्रमोद चव्हाण, नितीन गवळे, गोकुळ सोनवणे, अमर जाधव, खलील शहा, हारून शहा, मुरलीधर देसले, लक्ष्मण देसले, संजय खैरनार आदी ग्रामस्थ उपस्थित होते.  कार्यक्रम यशस्वीतेसाठी ग्रामविकास अधिकारी अनिल तोरवणे, कर्मचारी भटू ठाकरे, बाळा देसले, दाजीभाऊ हिरे, के.डी.देसले, सागर देसले आदींनी परिश्रम घेतले.

हेही वाचा:

Exit mobile version