नाशिक : बेल्ट व फायटरने युवकास मारहाण, पोलिस ठाण्यात 6 जणांविरुद्ध तक्रार | पुढारी

नाशिक : बेल्ट व फायटरने युवकास मारहाण, पोलिस ठाण्यात 6 जणांविरुद्ध तक्रार

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा
शहरातील उद्योगभवन परिसरातील हॉटेल वैष्णवीमध्ये एकास बेल्ट व फायटरने मारहाण केल्याची घटना घडली. या प्रकरणी अमोल किसन लोणारे (27, रा. लोणारवाडी) याने सिन्नर पोलिस ठाण्यात 6 जणांविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.

अमोल व त्याचे काही मित्र हॉटेलमध्ये जेवण करत असताना संशयित आरोपी भिकन राजपूत, सागर घुले, आकाश सातपुते, शुभम देसले, तुषार शिंदे, तुषार जाधव, साई वारुंगसे (सर्व रा. सिन्नर) यांनी अमोलला कारण नसताना शिवीगाळ केल्याने याचा जाब विचारला असता आरोपींनी त्यास बेल्टने मारहाण करण्यास सुरुवात केली. एकाने अमोलच्या डोक्यावर व छातीवर फायटरने मारत दुखापत केली. तर इतरांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करून तेथून फरार झाले. अमोलने सिन्नर पोलिस ठाण्यात येत सहा संशयित आरोपींविरुद्ध तक्रार दाखल केली असून, पोलिस नाईक चेतन मोरे पुढील तपास करत आहेत.

हेही वाचा :

Back to top button