पिंपरी : घर घ्या हो घर ; मोहननगर, उद्यमनगरमधील गृहप्रकल्पांना प्रतीक्षा लाभार्थ्यांची | पुढारी

पिंपरी : घर घ्या हो घर ; मोहननगर, उद्यमनगरमधील गृहप्रकल्पांना प्रतीक्षा लाभार्थ्यांची

मिलिंद कांबळे

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत मोहननगर (आकुर्डी) आणि उद्यमनगर (पिंपरी) येथे गृहप्रकल्प उभे करण्यात आले आहेत. मात्र या गृहप्रकल्पांना लाभार्थीच मिळत नसल्याने तब्बल 938 सदनिकांचे वितरण कसे करायचे असा प्रश्न महापालिका प्रशासनासमोर निर्माण झाला आहे. महापालिकेने मोठा गाजावाजा करीत पंतप्रधान आवास योजना जाहीर केली.

नाशिकमध्येही कुत्तागोलीची नशा ; अल्पवयीन मुलांकडून खरेदी, काय आहे कुत्तागोली?

आर्थिकदृष्टया दुर्बल घटकांसाठी (ईडब्ल्यूएस) चर्‍होली, बोर्‍हाडेवाडी, रावेत, डुडुळगाव, वडमुखवाडी, चिखली, दिघी, उद्यमनगर-पिंपरी गट क्रमांक 77 व 79, आकुर्डी (मोहननगर) या 10 ठिकाणी एकूण 9 हजार 458 सदनिका बांधण्याचे निश्चित करण्यात आले. त्याला सर्वसाधारण सभेने मंजुरीही दिली. त्यातील सध्या केवळ चर्‍होली व बोर्‍हाडेवाडी येथील एकूण 2 हजार 730 सदनिकांचा गृहप्रकल्प वेगात सुरू आहे. त्यासाठी लाभार्थ्यांकडून पहिला व दुसरा स्वहिस्सा स्वीकारला जात आहे.

काँग्रेसची गळती

रावेतच्या प्रकल्पास न्यायालयाच्या आदेशामुळे स्थगिती असल्याने काम दीड वर्षांपासून बंद आहे. डुडुळगाव (896 सदनिका), वडमुखवाडी (1,400 सदनिका), चिखली (1,400 सदनिका) व दिघी (840 सदनिका) येथील प्रकल्प अद्याप कागदावरच आहेत.
मोहननगर व उद्यमनगर येथील दोन्ही प्रकल्प अंतिम टप्प्यात आहेत. मोहनगरमध्ये 15 मजली 6 इमारती आहेत. तर, उद्यनगरमध्ये 15 मजली 2 इमारती आहेत.  इमारतींचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. येत्या तीन महिन्यांत 100 टक्के काम पूर्ण होणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगितले जात आहे.

शेतात करा गाळमातीचा वापर

चर्‍होली, बोर्‍हाडेवाडी व रावेत प्रकल्पातील 3 हजार 664 सदनिकांसाठी तब्बल 50 हजार अर्ज प्राप्त झाले होते; मात्र, या दोन्ही प्रकल्पास लाभार्थीच मिळत नसल्याचे धक्कादायक चित्र आहे. पालिकेच्या रस्तापुल व इतर विकास प्रकल्पासाठी जागा किंवा घरे बाधित झाल्याने बेघर झालेल्या नागरिकांसाठी या प्रकल्पात घरे दिली जाणार आहेत. त्याला नागरिकांचा अद्यापही प्रतिसाद नाही. या संदर्भात महापालिकेने दोन वेळा वृत्तपत्रात त्याबाबत जाहीर प्रकटन प्रसिद्ध केले होते; मात्र, त्यास काहीच प्रतिसाद नाही. त्यामुळे महापालिका प्रशासनाला लाभार्थ्यांची प्रतीक्षा करावी लागत आहे.

आरक्षणात जागा गेलेल्यांनी अर्ज करावेत

महापालिकेच्या विकासकामांत ज्यांच्या जमिनी व घरे गेली आहेत त्यांना राहण्यासाठी कोणतेही घर नाही, अशा नागरिकांनी महापालिकेकडे अर्ज करावेत. त्यांना मोहननगर व उद्यनमनगर येथील गृहप्रकल्पात सदनिका देण्यात येणार आहेत. यासंदर्भात क्षेत्रीय कार्यालयाकडून बाधित नागरिकांची यादी मागविण्यात येत आहे. त्या नागरिकांना संपर्क साधला जाणार आहे, असे महापालिकेच्या स्थापत्य विभागाचे कार्यकारी अभियंता शिरीष पोरेड्डी यांनी सांगितले.

‘अलमट्टी’प्रश्नी मंगळवारी बैठक

सदनिका वितरणासाठी इतर पर्यायाचा शोध

या गृहप्रकल्पांना प्रतिसाद मिळत नसल्याने इतर पर्यायाचा शोध महापालिकेकडून घेण्यात येत आहेत. पालिकेच्या वर्ग चारच्या कर्मचार्‍यांना सदनिका भाडेतत्त्वावर देण्याबाबत विचार केला जात आहेत. तसेच, वेगवेगळे पर्याय समोर येत आहेत.
प्रकल्पाची स्थिती

प्रकल्पाची स्थिती

ठिकाण          सदनिका            खर्च
मोहननगर          568          52 कोटी 56 लाख
उद्यमनगर          370          33 कोटी 64 लाख

 

Back to top button