नंदुरबार : गालावर चापट मारली म्हणून थेट पोटात सुरा भोसकला, तिघांना अटक | पुढारी

नंदुरबार : गालावर चापट मारली म्हणून थेट पोटात सुरा भोसकला, तिघांना अटक

नंदुरबार: पुढारी वृत्तसेवा : पानटपरीच्या उधारीवरून झालेल्या वादात गालावर चापट मारली म्हणून थेट पोटात सुरा भोसकल्याची घटना शहाद्यात घडली. मध्यरात्री दाखल झालेल्या या गुन्ह्यातील तिघांना अटक करण्यात आली.

शहादा शहरात शनिवारी (दि.१९) रात्री ८ च्या सुमारास प्रेस मारुती मैदानाच्या मोकळ्या जागेत दोन गटात वाद झाला. जखमी युवकाचा आतेभाऊ केबल डीश टी.व्ही.चालक गणेश मांगू नेरकर (२९, रा. गांधीनगर, शहादा) याच्या फिर्याद दिली. त्यावरुन मामे भाऊ देवेन्द्र समाधान पाटील याचा तीन दिवसापूर्वी आरोपी आकाश वाडीले याच्याशी पानटपरीवरील उधारीवरून वाद झाला. वादात देवेंद्रने आकाशच्या गालावर चापट मारली. त्यानंतर वादाचे मारहाणीत रुपांतर होत देवेंद्र गंभीर जखमी झाला. यामध्ये योगेश संजय मराठे (२२,रा. रामनगर शहादा), तुकाराम बच्चू पाटील (२५, सालदार नगर शहादा), आकाश उर्फ फाक्या शंकर वाडीले (२२, रा. साईबाबानगर शहादा) यांना अटक करण्यात आली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप आरक पुढील तपास करीत आहेत.

हेही वाचा :

Back to top button