CHSL 2021 exam update : संयुक्त उच्च माध्यमिक परीक्षेसाठी महत्त्वपूर्ण सूचना जारी | पुढारी

CHSL 2021 exam update : संयुक्त उच्च माध्यमिक परीक्षेसाठी महत्त्वपूर्ण सूचना जारी

पुढारी ऑनलाईन डेस्क : (CHSL 2021 exam update) : स्टाफ सिलेक्शन कनिशन अर्थात कर्मचारी निवड आयोगाने (SSC) एकत्रित उच्च माध्यमिक स्तर (10+2) साठी भरती अधिसूचना जारी केली आहे. या अंतर्गत सुमारे 5000 पदांची भरती केली जाणार आहे. सध्या रिक्त पदांची संख्या ही अंदाजे आहे. राज्यांमधून रिक्त पदांचा डेटा मिळाल्यानंतर अधिकृत वेबसाइटवर रिक्त पदांची संख्या अपडेट केली जाईल.

आयोगाने उमेदवारांना अर्जाच्या शेवटच्या तारखेपूर्वी परीक्षेसाठी अर्ज करण्याचा सल्ला दिला आहे. ऑनलाईन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 7 मार्च 2022 आहे. (CHSL 2021 exam update)

Image

अधिसूचनेत म्हटले आहे की, “उमेदवारांच्या हितासाठी एकत्रित उच्च माध्यमिक (10+2) परीक्षा-2021 च्या इच्छुक उमेदवारांनी शेवटच्या तारखेपूर्वी म्हणजेच ७ मार्चपूर्वी त्यांचे ऑनलाइन अर्ज सादर करावेत. कोणत्याही तांत्रिक बाबींचा सामना करावा लागू नये यासाठी हे आवाहन करण्यात आले आहे.

उमेदवार SSC च्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात https://ssc.nic.in/ आणि शक्य तितक्या लवकर अर्ज करू शकतात. उमेदवारांना विनंती आहे की त्यांनी अर्ज करण्यापूर्वी सर्व महत्त्वाच्या सूचना वाचा आणि त्यांची पात्रता तपासावी असे आवाहन केले आहे. (CHSL 2021 exam update)

हे ही वाचलं का ?

Back to top button