‘राष्ट्रासाठी राष्ट्रवादी’: राष्ट्रवादी काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध | पुढारी

'राष्ट्रासाठी राष्ट्रवादी': राष्ट्रवादी काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध

पुढारी ऑनलाईन डेस्क: पंतप्रधान मोदी म्हणजे एनडीएचा विश्वासू चेहरा आहे. त्यामुळे मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्याचा आमचा प्रयत्न आहे, असा निर्धार राष्ट्रवादीचे प्रमुख व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज व्यक्त केला. ‘राष्ट्रासाठी राष्ट्रवादी’ अशी घोषवाक्य असलेला राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचा जाहीरनामा आज प्रसिद्ध केला. यावेळी ते बोलत होते.

यावेळी प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, खासदार प्रफुल्ल पटेल, मंत्री हसन मुश्रीफ, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर आदी उपस्थित होते.

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्यात यावा, जातनिहाय जनगणना करण्यात यावी, यासाठी आमचा प्रयत्न राहणार आहे, उद्योगांना चालना देण्यासाठी, ग्रामविकासाच्या पंचसुत्रीनुसार आमचा विकास करण्याचा प्रयत्न राहणार आहे, असे यावेळी उमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

हेही वाचा 

Back to top button