केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतला कोल्हापूर, हातकणंगलेचा आढावा

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतला कोल्हापूर, हातकणंगलेचा आढावा

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी कोल्हापूर दौर्‍यावर असणार्‍या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शुक्रवारी करवीर निवासिनी अंबाबाईचे दर्शन घेतले. दरम्यान, मंत्री शहा यांनी मुक्काम स्थळी कोल्हापूर व हातकणंगले मतदारसंघातील परिस्थितीची सविस्तर माहिती स्थानिक पदाधिकार्‍यांकडून घेतली. तसेच निवडणुकी संदर्भात महत्त्वपूर्ण सूचना दिल्याची माहिती खा. धनंजय महाडिक यांनी दिली.

दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास गृहमंत्री आपल्या ताफ्यासह अंबाबाई मंदिराच्या दक्षिण दरवाजातून दाखल झाले. त्यांचे स्वागत देवस्थान समितीचे व्यवस्थापक महादेव दिंडे, धर्मशास्त्र मार्गदर्शक गणेश नेर्लेकर-देसाई व सहकार्‍यांनी केले. यावेळी खा. धनंजय महाडिक, प्रदेश भाजपचे प्रदेश सचिव महेश जाधव, राहुल चिकोडे, जिल्हाध्यक्ष विजय जाधव, तुषार देसाई, अमित हुक्केरीकर, भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. दर्शन घेऊन मंत्री शहा लगेचच पुढील प्रवासासाठी विमानतळाकडे रवाना झाले.

शुक्रवारी सकाळी कोल्हापूर व हातकणंगले मतदारसंघाचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक, धैर्यशील माने, समरजित घाटगे यांच्यासर्व सर्व मित्र पक्षाचे प्रमुख नेते, पदाधिकारी यांच्याशी सविस्तर चर्चा केली. सहकार, कृषी, राजकारणासह राज्य व देशातील परिस्थिती संदर्भात माहिती घेतली. कोल्हापूर व हातकणंगले मतदारसंघातील उमेदवारांना अधिकाधिक मताधिक्याने विजयी करण्यासाठी यथाशक्ती प्रयत्न करण्याचे आवाहन मंत्री शहा यांनी केले.

सकाळच्या सत्रात अधिकाधिक मतदानासाठी प्रयत्न करावेत

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या कोल्हापूर दौर्‍याबद्दल माध्यमांनी खा. महाडिक यांच्याकडे विचारणा केली असता, ते म्हणाले, निवडणुकीचा प्रचार 5 मे रोजी 5 वाजता थांबणार असला तरी आपला महायुतीचा प्रचार दि. 7 मे रोजी मतदान पूर्ण हाऊन ईव्हीएम मशिन सील होईपर्यंत सुरू ठेवावा. उन्हाच्या तडाख्यामुळे या आधीच्या तीन फेर्‍यांमध्ये मतदानाची संख्या कमी झाली असल्याने पुढील मतदानावेळी सकाळी 7 ते 10 यावेळेत अधिकाधिक मतदान होईल. यासाठी प्रयत्न करावेत, अशा महत्त्वपूर्ण सूचना मंत्री शहा यांनी दिल्याचे त्यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news