लोकसभा निवडूक पवार विरुद्ध पवार नव्‍हे, मोदी विरुद्ध गांधी : अजित पवार | पुढारी

लोकसभा निवडूक पवार विरुद्ध पवार नव्‍हे, मोदी विरुद्ध गांधी : अजित पवार

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : यंदाची लोकसभा निवडणूक पवार कुटुंबीयांमधील लढाई नाही. ही निवडणूक पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांच्यातील लढाई आहे. त्‍यामुळे यंदाची लोकसभा निवडणूक पवार विरुद्ध पवार अशी नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी आहे, असे उपमुख्‍यमंत्री अजित पवारांनी स्‍पष्‍ट केले. ‘इंडिया टुडे टीव्ही’ला दिलेल्‍या विशेष मुलाखतीमध्‍ये ते बोलत होते.

आम्‍ही पंतप्रधान मोदी तिसऱ्यांदा सत्तेवर येण्‍यासाठी मते मागताेय

यावेळी अजित पवार म्‍हणाले की, लोकसभा निवडणूक पवार कुटुंबीयांमधील लढाई नाही. ती नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी आहे.
अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या बारामती लोकसभा मतदारसंघातून त्यांची चुलत बहिण आणि विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात निवडणूक लढवत आहेत. याबाबत बोलताना ते म्‍हणाले, “ही निवडणूक पवार कुटुंबीयांमधील लढाई नाही. ती नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी आहे. आम्‍ही प्रचारात भाजप आणि पंतप्रधान मोदी तिसऱ्यांदा सत्तेवर येण्‍यासाठी संसदेत खासदार पाठवले पाहिजे, असे सांगताो. आम्‍ही विकासासाठी मते मागत आहे.”

मतांसाठी कोणावरही दबाव आणलेला नाही

बारामतीतील मतदारांवर दबाव आणत असल्याच्या आरोपांचाही त्‍यांनी यावेळी इन्‍कार केला. जर कोणावर दबाव आणला असेल, तर त्यांना समोर आणा, फोनवरून संभाषण झाले असेल, तर त्यांच्यावर कसा दबाव आणला गेला हे दाखवण्यासाठी रेकॉर्ड दाखवा, असे आवाहनही त्‍यांनी केले. निवडणुका देशावर कोण राज्य करणार हे ठरवायचे आहे. पंतप्रधान मोदी आणि राहुल गांधी यांच्यातील लढाई आहे.

प्रत्येक उमेदवाराचा विजय सुनिश्चित करणे खूप महत्वाचे

अजित पवारांना यांनी सुप्रीया सुळे यांच्‍याविरोधात सुनेत्रा पवार यांना उभे करावे यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दबाव आणल्‍याचा इन्‍कारही त्‍यांनी यावेळी केला. अमित शहा यांनी फक्त निवडक गुणवत्ता असलेल्या उमेदवारांना उभे करण्यास सांगितले. प्रत्येक उमेदवाराचा विजय सुनिश्चित करणे खूप महत्वाचे आहे, असेही ते म्‍हणाले.

हेही वाचा : 

 

 

Back to top button