धक्कादायक! दोन महिन्यांत ४२७ शेतकऱ्यांनी जीवनयात्रा संपवली | पुढारी

धक्कादायक! दोन महिन्यांत ४२७ शेतकऱ्यांनी जीवनयात्रा संपवली

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : सरकारने कर्जमाफी केली असली तरी शेतकऱ्यांचे जीवनयात्रा संपवणे सुरूच आहे. जानेवारी-फेब्रुवारीत राज्यातील ४२७ शेतकऱ्यांनी जीवन संपवले आहे. यापैकी केवळ ६२ जणांचे कुटुंबीय शासनाच्या आर्थिक मदतीस पात्र आहेत; तर २३ शेतकऱ्यांच्या घटना अपात्र असून ३४२ घटनांचा पोलिस तपास सुरू आहे.

अतिवृष्टी, पूर, अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि गारपिटीमुळे नुकसान झाल्यासही सरकारकडून तातडीने वित्त सहाय्य केले जाते. तरीही राज्यात शेतकऱ्यांचे जीवन संपवण्याचे सत्र सुरूच आहे. मागील दोन महिन्यात अमरावती विभागात १७५, मराठवाडा १४६, नागपूर ५४, नाशिक ४८ तर पुणे विभागात चार शेतकऱ्यांनी जीवनयात्रा संपवली आहे. नापिकी, कर्जबाजारीपणा आणि परतफेडीचा तगादा यामुळे जीवन संपवणाऱ्या शेतकऱ्याच्या कुटुंबाला एक लाख रुपये मदत दिली जाते.

हेही वाचा : 

Back to top button