31 डिसेंबरला सरकार जाणार, म्हणून 2 जानेवारीची तारीख : संजय राऊत | पुढारी

31 डिसेंबरला सरकार जाणार, म्हणून 2 जानेवारीची तारीख : संजय राऊत

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणार्‍या मनोज जरांगे-पाटील यांनी आरक्षणासाठी 24 डिसेंबर 2023 तर राज्य सरकारने 2 जानेवारीची मुदत दिली आहे. पण, 31 डिसेंबरला राज्यातील घटनाबाह्य सरकार जाणार आहे. त्यामुळे सरकार आरक्षणाची जबाबदारी घेण्यास तयार नाही.  आपले शिर उडणार असल्याने आरक्षणाची जबाबदारी नको म्हणून सरकारने जरांगे-पाटील यांना 2 जानेवारी ही तारीख दिली, अशी टीका शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली.

राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने गुरुवारी जरांगे पाटील यांची भेट घेऊन आरक्षणासाठी 2 जानेवारीपर्यंतची मुदत मागून घेतली आहे. सरकारच्या अश्वासनानंतर जरांगे-पाटील यांनी उपोषण मागे घेतले. या पार्श्वभूमीवर राऊत यांनी सरकारवर टीका केली.

Back to top button