Aaditya Thackeray: 'मी मुख्यमंत्री शिंदेंना भेटलो, त्‍यांना एक प्रश्‍न विचारला...' : आदित्य ठाकरे | पुढारी

Aaditya Thackeray: 'मी मुख्यमंत्री शिंदेंना भेटलो, त्‍यांना एक प्रश्‍न विचारला...' : आदित्य ठाकरे

पुढारी ऑनलाईन डेस्क : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मी शुक्रवारी (दि. २७) भेटलो. त्यांना एक प्रश्न विचारला. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “असे प्रश्न विचारू नका की, ज्याची उत्तरे नाहीत,” अशी माहिती आज (दि.२८) मुंबई येथे आयोजित पत्रकार परिषदेत  शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी दिली. (Aaditya Thackeray)

असे प्रश्न विचारू नका की, ज्याची उत्तरे नाहीत…

या वेळी आदित्य ठाकरे म्हणाले की, मी काल मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी मी त्‍या एक प्रश्‍न विचारला. मात्र त्‍यांनी माझ्‍या प्रश्‍नाला उत्तर दिले नाही. उलट ते म्‍हणाले की,  “असे प्रश्न विचारू नका की, ज्याची उत्तरे नाहीत”.

मुंबईतील रस्त्यांचा विकास म्हणजेच एक मोठा घोटाळा

मुंबईतील रस्त्यांचा विकास म्हणजेच एक मोठा घोटाळा आहे. मुंबईत रस्त्यांच्या विकासाच्या नावाखाली घोटाळे झाले आहेत. खोके सरकारनं रस्त्यांबाबत काहीही केलेलं नाही. केवळ रस्त्याच्या काँक्रिटीकरणावर सरकारचा भर आहे. २००४ उजाडलं तरी, २०२१-२२ ची कामं रखडलेलीच आहेत, अशी टीका ठाकरे यांनी शिंदे सरकारवर केला आहे. तर वादग्रस्त कंत्राटदारांची कंत्राटं रद्द होणार का? असा सवाल देखील आदित्य ठाकरे यांनी केला आहे. (Aaditya Thackeray)

आमचं सरकार आल्यास घोटाळबाजांना जेलमध्ये टाकू

मुंबईत साडेआठ हजार कोटींची रस्त्यांची कामं सुरू आहेत. राज्यात बिल्डर्स, कॉन्ट्रॅक्टर्सचं सरकार आहे. सरकारमध्ये ठेकेदार, कंत्राटदारांचे लाड केले जात आहेत. त्यामुळे बांधकाम क्षेत्राबाबत सरकारने गंभीर होणे गरजेचं आहे. वाढत्‍या बांधकामांमुळे प्रदुषणाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. आमचं सरकार आल्यास या घोटाळबाजांना सोडणार नाही, त्यांना आम्ही जेलमध्ये टाकू असेही ते म्हणाले. तसेच मुंबईकरांना एका वर्षात खड्डेमुक्त रस्ते द्या अशी मागणी देखील आदित्य ठाकरे यांना यावेळी केली. (Aaditya Thackeray)

हेही वाचा:

Back to top button