छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षणासाठी क्रांतीचौकात ढोल बजाव आंदोलन | पुढारी

छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षणासाठी क्रांतीचौकात ढोल बजाव आंदोलन

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : राज्यात मराठा आरक्षणाच्या मागणीने जोर धरला आहे. या मागणीकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने क्रांती चौक येथे शनिवारी( दि.२९) ढोल बजाव आंदोलन करण्यात आले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय, एक मराठा लाख मराठा, आरक्षण आमच्या हक्काचे, अशा जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला.

राज्यातील मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे, या मागणीसाठी मनोज जरांगे-पाटील यांनी राज्य शासनाला दिलेली मुदत बुधवारी (दि.२४) संपली. त्यामुळे जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटी येथे पुन्हा एकदा बेमुदत उपोषण सुरू केले आहे. त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी छत्रपती संभाजीनगर मधील क्रांतीचौक येथे मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाजाच्या वतीने आंदोलन केले जात आहे. आज आंदोलनाच्या चौथ्या दिवशी क्रांती चौकात ढोल बजाव आंदोलन करण्यात आले. यावेळी विजय काकडे, अरुण नवले, गणेश उगले, सचिन सरकटे, अशोक वाघ, शारदा शिंदे, दिपाली बोरसे, लक्ष्मण नवले, डॉ. दिव्या पाटील यांच्यासह मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता.

हेही वाचा : 

Back to top button