आमदार अपात्रता प्रकरणी आज सुनावणी | पुढारी

आमदार अपात्रता प्रकरणी आज सुनावणी

मुंबई; पुढारी वृत्तसेवा :  शिवसेना आमदारांच्या अपात्रतेबाबत गुरुवारी पुन्हा सुनावणी होणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर सुनावणी घेणार आहेत.

विधानसभा अध्यक्षांनी गेल्या आठवड्यातील सुनावणीवेळी महत्त्वाचा निर्णय घेतला होता. ठाकरे गटाच्या मागणीनुसार, 34 याचिका एकत्र करून सुनावणी घेण्याबाबतचा निर्णय विधानसभा अध्यक्षांनी घेतला होता. यासाठी विधानसभा अध्यक्षांनी दोन्ही गटांना कागदपत्रे सादर करण्यासाठी 25 ऑक्टोबरपर्यंतची मुदत दिली होती. ही मुदत संपल्यानंतर गुरुवारी दुपारी चार वाजता या प्रकरणावर नार्वेकर प्रत्यक्ष सुनावणी घेणार आहेत. आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकांवरील सुनावणीचे वेळापत्रक सादर करण्याबाबत सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्षांना शेवटची संधी दिली आहे. विधानसभा अध्यक्षांनी 30 ऑक्टोबरपर्यंत वेळापत्रक जाहीर केले नाही, तर थेट सुप्रीम कोर्टच वेळापत्रक ठरवणार आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सुनावणीच्या प्रक्रियेला वेग दिल्याचे बोलले जात आहे.

Back to top button