मुंबईत आणखी ३३० चार्जिंग स्टेशन होणार ! | पुढारी

मुंबईत आणखी ३३० चार्जिंग स्टेशन होणार !

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : मुंबई शहरात बेस्टच्या वतीने खासगी इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंगसाठी ३३० पेक्षा जास्त स्टेशन सुरू करण्यात येणार आहेत. त्यात महानगर गॅसच्या मदतीने गोरेगाव, ओशिवरा आणि घाटकोपर बस डेपोत चार्जिंग स्टेशन सुरु आहे. लवकरच १३ डेपोत ही सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे. काही रेल्वे स्थानकांतही चार्जिंग सुविधा उपलब्ध आहे.

टाटा पॉवर : मुंबई आणि नवी मुंबईमध्ये ८०० हून अधिक चार्जिंग पॉइंट्स. गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये ५०० चार्जिंग पॉइंट बसवले आहेत. चार्जिंग स्टेशन्स उभारण्यासाठी पेट्रोल पंप आणि मॉल्सशीही करार केला आहे.

अदानी इलेक्ट्रिसिटी : अलीकडेच ८,५०० ईव्ही चार्जर बसवण्याची योजना राबविली. सोसायटी कॉम्प्लेक्स आणि इतर ठिकाणी ७५ चार्जिंग स्टेशन बसवले आहे, त्याशिवाय ग्राहकांना ६०० चार्जिंग कनेक्शन उपलब्ध करून दिले.

महावितरण: पुरवठा क्षेत्रात (भांडुप, मुलुंड, ठाणे आणि नवी मुंबई) दीड हजार चार्जिंग स्टेशन्स उभारणार.

Back to top button