“त्यांची ४० कोटींची फाईल…”; मनीषा कायंदेंच्या शिंदे गटातीत प्रवेशावर ठाकरे गटाची प्रतिक्रिया | पुढारी

"त्यांची ४० कोटींची फाईल..."; मनीषा कायंदेंच्या शिंदे गटातीत प्रवेशावर ठाकरे गटाची प्रतिक्रिया

पुढारी ऑनलाईन डेस्क : विधान परिषद आमदार आणि प्रवक्त्या, मनीषा कायंदे यांनी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत रविवारी रात्री ठाणे येथे जाहीर प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “जाऊ दे, याने काय फरक पडतो?” असे म्हणत राऊत यांनी कायंदे यांच्याबाबत सुरूवातीला बोलण्याचे टाळले. नंतर ते म्हणाले की, ” ४० कोटींची कुठली तरी फाईल बाहेर आली म्हणून त्या बाई (मनिषा कायंदे) गेल्या, असे मी काल व्यासपीठावर ऐकले होते, मला त्याबद्दल काही माहिती नाही, मी यावर फार बोलणार नाही.”

उद्धव ठाकरे यांनी वर्षभरात पक्षबांधणीचे काम केले नाही. सकाळी उठून ठुकरटवाडी करणारे लोक शिवसेनेचा चेहरा कसे, असा प्रश्न करत मनीषा कायंदे यांनी शिंदे गटातील प्रवेशानंतर उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. ठाकरे गटानेही कायंदे यांच्यावर पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत त्यांची शिवसेना ठाकरे गटातून हकालपट्टी करण्यात आल्याचे पत्रक जारी केले. दरम्यान, मनिषा कायंदे यांच्या शिवसेना प्रवेशावर राऊत यांनी आज माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली. “जाऊ दे, याने काय फरक पडतो? ती (मनीषा कायंदे) कुठून आली अन् कुठे गेली हे मला माहीत नाही. तिला पार्टीत कोणी आणले, ती कोण आहे आणि त्यांना एमएलसी पद कोणी दिले हे देखील मला माहीत नाही. असे लोक येतात आणि जातात. मी त्यांना कचरा म्हणतो,” असे राऊत म्हटले आहे.

हेही वाचा : 

Back to top button