आ. मनीषा कायंदे यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश | पुढारी

आ. मनीषा कायंदे यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : शिवसेना ठाकरे गटाच्या विधान परिषदेच्या आमदार मनीषा कायंदे यांनी अखेर रविवारी (दि. 18) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ठाण्यातील आनंदाश्रम येथे शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला.

त्यांनी लगेचच ठाकरे गटावर हल्लाबोल केला. मागील एक वर्ष प्रतीक्षा केली. मात्र, उद्धव ठाकरे यांनी काय केले, असा सवाल त्यांनी केला. आणखीही अनेकजण शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचा दावा कायंदे यांनी केला. मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांची सचिवपदी नियुक्ती केली.

दरम्यान, रविवारी शिवसेना ठाकरे गटाचे वरळीत शिबिर पार पडले. त्यापूर्वीच आमदार कायंदे या नॉट रिचेबल झाल्या होत्या. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा पक्षप्रवेश विशेष महत्त्वाचा मानला जात आहे.

Back to top button