New Parliament Inauguration : “मग, ‘त्यावेळी’ बहिष्कार का टाकला नाही?…” फडणवीसांचा विरोधकांना सवाल | पुढारी

New Parliament Inauguration : "मग, 'त्यावेळी' बहिष्कार का टाकला नाही?..." फडणवीसांचा विरोधकांना सवाल

पुढारी ऑनलाईन डेस्क : संसदेच्‍या नवीन इमारतीच्या उद्घाटन कार्यक्रमावर विरोधी पक्षांनी बहिष्‍कार टाकला आहे. त्‍यांच्‍या या निर्णयाचा मी निषेध करतो. विरोधक म्हणजे खुर्चीचे व्यापारी आहेत. त्यांच्याकडे ना निती आहे ना नेता. हे सत्ता आणि खुर्चीसाठी एकत्र येतात. यापूर्वी  देशातील विधिमंडळ व संसदेतील अंतर्गत इमारतीचे उद्‍घाटन तत्‍कालिन सत्ताधारी नेत्‍यांनीच केले हाेते, असे स्‍पष्‍ट करत त्‍यावेळी का बहिष्‍कार टाकला नाही, असा सवाल उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज ( दि. २५) माध्‍यमांशी बाेलताना केला. (New Parliament Inauguration)

New Parliament Inauguration : मी विरोधकांचा निषेध करतो

देशाच्या नवीन संसद इमारतीचे उद्घाटन २८ मे राेजी पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्‍या हस्‍ते हाेणार आहे. संसद भवनाच्या उद्घाटन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्‍या हस्‍ते व्‍हावे, अशी मागणी विराेधी पक्षांनी केली आहे. तृणमूल काँग्रेस, राजद, संयुक्त जद, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना (युबीटी) या पक्षांसह १९ हून अधिक विरोधी पक्षांनी उद्घाटन कार्यक्रमावर बहिष्कार टाकला आहे.

विराेधकांच्‍या बहिष्‍कारबाबत बाेलताना उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “मी विरोधकांचा निषेध करतो. हे विरोधक म्हणजे खुर्चीचे व्यापारी आहेत. त्यांच्याकडे ना निती आहे ना नेता आहे. हे सर्वजण सत्ता आणि खुर्चीसाठी एकत्र येत आहेत. त्यांना मोदींची लोकप्रियता पाहवत नाही.  नरेंद्र मोदी यांचा मुकाबला करता येणार नाही, याची त्‍यांना जाणीव आहे. त्‍यामुळेच विराेधी पक्ष  राजकारणासाठी हे सर्व करत आहेत.”

संसदेच्‍या नवीन इमारतीच्‍या उद्‍घाटन सोहळ्यावर बहिष्‍कार टाकणे म्‍हणजे लोकशाहीला नाकारण्‍या सारखच आहे. महाराष्‍ट्र विधानसभेचे उद्‍घाटन तत्‍कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्‍या हस्‍ते झाले त्‍यावेळी तत्‍कालिन राज्‍यपालांच्‍या हस्‍ते हे उद्‍घाटन का केले नाही. संसदेच्या ॲनेक्स इमारतीचे उद्‍घाटन तत्‍कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्‍या हस्ते झालं, संसदेच्‍या ग्रंथालयाचे उद्‍घाटन तत्‍कालिन पंतप्रधान राजीव गांधी यांच्‍या हस्‍ते झाले तेव्‍हा राष्‍ट्रपतींची आठवण का झाली नाही.  तेव्हा बहिष्‍कार का टाकला नाही, असे सवालही यावेळी फडणवीस यांनी विराेधकांना केले.

हेही वाचा :

Back to top button