बॉलीवूडमधील दोन प्रसिद्ध निर्मात्यांवर प्राप्तिकर खात्याची धाड | पुढारी

बॉलीवूडमधील दोन प्रसिद्ध निर्मात्यांवर प्राप्तिकर खात्याची धाड

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : राजकीय नेतेमंडळी आणि व्यावसायिकांनंतर आता प्राप्तीकर खात्याने आपला मोर्चा बॉलिवूडकडे वळवला आहे. बुधवारी बॉलिवूडमधील दोन प्रसिद्ध निर्माते जयंतीलाल गाडा आणि विनोद भानुशाली यांच्या घर, कार्यालयावर छापेमारी केल्याची माहिती समोर आली आहे. या कारवाईने बॉलिवूडमध्ये खळबळ उडाली आहे.

अधिकाऱ्यांनी जयंतीलाल गाडा यांचे घर आणि त्यांची प्रोडक्शन कंपनी असणाऱ्या पेन स्टुडिओजच्या कार्यालयाची झाडाझडती घेतली. याचवेळी निर्माते विनोद भानुशाली यांच्याही घर, कार्यालयावर प्राप्तीकर विभागाने छापेमारी केली. भानुशाली हे देशातल्या अग्रणी म्युझिक कंपनीशी संलग्न होते. जयंतीलाल गाडा आणि त्यांच्या प्रोडक्शन हाऊसकडे अनेक मोठ्या बॅनर्सचे चित्रपट असतात. त्यांच्याकडे गाजलेल्या मालिकांचेही हक्क असल्याचे बोलले जाते. तर, भानुशाली यांनी त्यांच्या ‘भानुशाली फिल्म्स’ या बॅनरखाली काही चित्रपटांची निर्मिती केली आहे..

Back to top button