मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला; लोखंडी रॉडने मारहाण, रूग्‍णालयात दाखल | पुढारी

मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला; लोखंडी रॉडने मारहाण, रूग्‍णालयात दाखल

मुंबई ; पुढारी ऑनलाईन मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर आज (शुक्रवार) सकाळी मॉर्निंग वॉक करताना हल्‍ला झाला. संदीप देशापांडे शिवाजी पार्कात नेहमी प्रमाणे मॉर्निंग वॉकला गेले होते. यावेळी त्‍यांच्यावर तोंडाला मास्‍क लावून आलेल्‍या हल्‍लेखोरांनी त्‍यांच्यावर हल्‍ला करत लोखंडी रॉड आणि स्‍टंम्‍पने मारहाण केली. या हल्‍ल्‍यात देशपांडे जखमी झाले आहेत. त्‍यांना हिंदुजा रूग्‍णालयात दाखल करण्यात आले आहे. ४ अज्ञातांनी हल्‍ला केल्‍याची माहिती समोर येत आहे.

अचानक हा हल्‍ला झाल्‍याने वेसावध देशपांडे या हल्‍ल्‍यात जखमी झाले. यावेळी शिवाजी पार्कात मॉर्निंग वाकला आलेल्‍या लोकांनी त्‍यांना हल्‍लेखोरांपासून वाचवण्याचा प्रयत्‍न केला असता हल्‍लेखोर तेथून पसार झाले. यानंतर स्‍थानिक नागरिकांनी त्‍यांना हिंदुजा रूग्‍णालयात दाखल केले. त्‍यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत. दरम्‍यान देशपांडे यांच्यावर हल्‍ला झाल्‍याचे वृत्‍त पसरताच मनसेच्या नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी हिंदुजा रूग्‍णालयात गर्दी केली.

हेही वाचा : 

Back to top button