मोठी बातमी : अनिल देशमुखांना मोठा दिलासा, जामिनाविरोधातील ‘सीबीआय’ची याचिका सर्वोच्‍च न्‍यायालयाने फेटाळली | पुढारी

मोठी बातमी : अनिल देशमुखांना मोठा दिलासा, जामिनाविरोधातील 'सीबीआय'ची याचिका सर्वोच्‍च न्‍यायालयाने फेटाळली

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांना भ्रष्‍टाचार प्रकरणी उच्‍च न्‍यायालयाने दिलेल्‍या जामिनाविरोधात सीबीआयने सर्वोच्‍च न्‍यायालयात याचिका दाखल केली होती. आज ही याचिका सर्वोच्‍च न्‍यायालयाने फेटाळून लावली आहे.

सीबीआयने दाखल केलेल्‍या याचिकेवर सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती व्ही रामसुब्रमण्यम आणि न्‍यायमूर्ती जेबी पार्डीवाला यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. खंडपीठाने स्पष्ट केले की, उच्च न्यायालयाने दिलेल्या निरीक्षणांचा खटल्यावर परिणाम होणार नाही आणि तो केवळ जामीन देण्यापुरता मर्यादित आहे.

देशमुखांच्या बाजूने उच्च न्यायालयाने दिलेला जामीन आदेश रद्द करण्याची मागणी सीबीआयने केली होती. ही याचिका सर्वोच्‍च न्‍यायालयाने फेटाळून लावली आहे. १२ डिसेंबरला उच्च न्यायालयाने देशमुख यांना १ लाखांच्या जातमुचलक्यावर जामीन दिला होता. यासोबतच न्यायालयाने सीबीआयला जामीन आदेशाविरोधात अपील करण्यासाठी १० दिवसांचा वेळ दिला होता. नोव्हेंबर २०२२ रोजी मुंबईतील विशेष न्यायालयाने देशमुख यांची जामीन याचिका फेटाळली होती. कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयाला देशमुख यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्यानंतर देशमुख यांना उच्च न्यायालयाने जामीन दिला होता.

हे ही वाचा :

 

Back to top button