किशोरी पेडणेकरांचे घर पालिकेच्या ताब्यात! | पुढारी

किशोरी पेडणेकरांचे घर पालिकेच्या ताब्यात!

मुंबई; पुढारी वृत्तसेवा :  मुंबईतील वरळी गोमाता नगरमधील माजी महापौर किशोरी मुंबई महानगरपालिकेच्या जी दक्षिण विभागाने ताब्यात घेतले आहे.  पेडणेकर यांचे घर आणि कार्यालय वरळी येथील गोमाता नगरमधील सदानिका व कार्यालय झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाने (एसआरए) गंगाराम बोगा यांना वितरित केली होती. या सदनिकेचा वापर बोगा यांनी करणे आवश्यक होते. मात्र त्यांनी ही सदनिका माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना राहण्यास दिल्याची माहिती पेडणेकर यांनी नामनिदर्शन पत्रासह मुंबई महापालिकेला दिल्याचे सहकार विभागाच्या निदर्शनास आले आहे.

त्यामुळे बोगा यांनी एसआरएच्या नियमांचे उल्लंघन केल्याचा अहवाल सहकार विभागाने एसआरए अधिकाऱ्यांकडे सादर केला आहे. त्यानुसार सक्षम प्राधिकारी यांना महाराष्ट्र झोपडपट्टी अधिनियम १९७१ च्या कलम ३ (ई) अन्वये कारवाई करावी, असे एसआरएने पालिकेच्या प्रभादेवी जी दक्षिण विभागाला पत्र- द्वारे कळवले होते. यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे.

दरम्यान, वरळी एसआरए प्रकल्पातील गाळे किशोरी पेडणेकर यांनी हडपले, त्यांनी घुसखोरी करून घराचा ताबा घेतला याबाबत दोन वर्षांपूर्वी तक्रार केली होती. पेडणेकर यांनी दहा वर्षांहून अधिक काळ बेकायदेशीरपणे सदनिकांवर कब्जा केला, असा आरोप भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी ट्विटद्वारे केला

Back to top button