police : पोलीस अधिकारी विनंती बदल्यांच्या प्रतीक्षेत ! राज्यभरातील १७० पोलीस अधिकऱ्यांचे अर्ज; पुढील आठवड्यात होणार निर्णय ? | पुढारी

police : पोलीस अधिकारी विनंती बदल्यांच्या प्रतीक्षेत ! राज्यभरातील १७० पोलीस अधिकऱ्यांचे अर्ज; पुढील आठवड्यात होणार निर्णय ?

मुंबई : गणेश शिंदे; वरिष्ठ अधिकारी ते पोलीस निरीक्षक यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या अन्य जिल्हयात बदल्या झाल्या तर काहींना बढत्या मिळाल्या. परंतु, वैद्यकिय, कौटुंबिक व इतर कारणाकरिता विनंती बदलीसाठी अर्ज केलेल्या राज्यभरातील पोलीस निरीक्षक ते उपनिरीक्षक यांच्या बदल्या अद्याप झालेल्या नाहीत. त्यामुळे विनंती बदल्यांना मुहूर्त कधी मिळणार अशी विचारणा पोलिसांमधून (police) होत आहे.

पोलीस महासंचालक कार्यालयाकडे राज्यभरातील सुमारे १७० पोलीस अधिकऱ्यांनी विनंती बदल्यांची मागणी केली असल्याची चर्चा पोलीस दलात सुरु आहे. कार्यकाळ पूर्ण झालेले पोलीस अधीक्षक- उपायुक्त दर्जासह पोलीस निरीक्षक यांच्या आतापर्यंत बदल्या झाल्या. त्यामुळे इतर पोलीस अधिकारी हे विनंती बदलीच्या प्रतिक्षेत आहेत.

police : राज्यभरातील १७० पोलीस अधिकऱ्यांचे अर्ज

गेल्या दोन वर्षात कोरोना काळात राज्यातील सर्वच वरिष्ठ पो- लीस अधिकारी पासून ते पोलीस निरीक्षक यांच्या बदल्या रखडल्या होत्या. कार्यकाळ पूर्ण होऊनही अनेक अधिकाऱ्यांना त्याठिकाणी काम करावे लागत होते. मात्र; कोरोना निर्बंध उठवल्यामुळे एप्रिल- मे या महिन्यात मोठ्या प्रमाणात बदल्या झाल्या. जूननंतर राज्यात सत्तांतर झाले. त्यामुळे बदल्या रखडल्या.दरवर्षी एप्रिल व मे या दोन महिन्यात बदल्या होतात. कोरोना काळ आणि राज्यातील सत्तांतर व गणेशोत्सव, नवरात्रौत्सवानंतर या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीला वेग आला. ७ नोव्हेंबरला कार्यकाळ पूर्ण झालेले पोलीस अधीक्षक, पो- लीस उपायुक्तांच्या तर ९ डिसेंबरला २२५ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या झाल्या. त्यात मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेल्या ३२ पोलीस निरीक्षक यांच्या बदल्यांचा समावेश आहे. तसेच राज्यातील ३३५ सहाय्यक पोलीस निरीक्षक तर ८४ उपनिरीक्षक यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. राज्यात ३२ पोलीस निरीक्षकांना सहाय्यक पोलीस आयुक्त/पोलीस उपअधीक्षक (डीवायएसपी) पदोन्नती देण्यात आली. पण त्यांची नियुक्ती करण्यात आलेली नाही.

नागपूरात अधिवेशनाच्या आधी निर्णबाबत साशंकता

यावर्षी १९ डिसेंबरला नागपूरात अधिवेशन होत आहे. त्यासाठी सर्वच प्रशासकीय अधिकारी यांची धावपळ सुरु आहे. पोलीस उपअधीक्षक, सहाय्यक पोलीस आयुक्त ते पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक या दर्जाचे अधिकऱ्यांना बंदोबस्तासाठी नेमण्यात आले. त्यामुळे पुढील आठवड्यात बदल्या होतील की नाही याबद्दल साशंकता व्यक्त होत आहे.

हेही वाचा

Back to top button