Rohit Pawar tweet : कामाख्या देवीला रोहित पवारांचे साकडं,”तंत्रमंत्र, जादूटोणा …” | पुढारी

Rohit Pawar tweet : कामाख्या देवीला रोहित पवारांचे साकडं,"तंत्रमंत्र, जादूटोणा ..."

पुढारी ऑनलाईन डेस्क :  “हे माता कामाख्या देवी. राज्यातील सामान्य माणसांच्यावतीने तुला प्रार्थना! सत्ता’बदला’साठी तू आशीर्वाद दिला पण आता बदल्याची भाषा थांबावी. राज्याचे उद्योग गुजरातने पळवू नये. युवांच्या नोकरीचा घास हिरावला जाऊ नये. महाराष्ट्राची बदनामी सहन करू नये. वाचाळ मंत्र्यांना तारतम्य यावं.अंधश्रध्दा, तंत्रमंत्र, जादूटोणा याला राज्‍याचे सरकारने बळी पडू नये. तसंच राज्याचा स्वाभिमान आणि अस्मिता अबाधित रहावी.. हे अडचणींचे ‘डोंगार’ पार करण्यासाठीही जे-जे हवं ते सर्व राज्य सरकारला दे!” असं ट्विट करत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते रोहित पवार (Rohit Pawar tweet ) यांनी शिंदे गटावर निशाणा साधला. 

 Rohit Pawar tweet : कामाख्या देवीला साकडं

जून महिन्‍यात एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंडाची झेंडा फडकवला. ते समर्थक आमदारांना घेवून थेट आसामची राजधानी गुवाहाटीला गेले. या गटाने गुहावटीतील कामाख्या (Kamakhya Temple) देवीच्‍या मंदिराला भेट दिली होती. काही दिवसांनी राज्‍यात शिंदे-फडणवीस युती होत सरकार स्थापन झाले. आज (दि.२६) पुन्हा एकदा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर चार-पाच महिन्यांनी गटातील काही मंत्री व आमदार हे कामाख्या देवीच्या दर्शनासाठी गुवाहाटीला जाणार आहेत. तेथे ते कामाख्या देवीचं दर्शन घेणार आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते रोहित पवार (MLA Rohit Pawar tweet ) यांनी ट्विट करत शिंदे गटावर निशाणा साधला आहे. 

वाचाळ मंत्र्यांना तारतम्य यावं

रोहित पवारांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, “हे माता कामाख्या देवी. राज्यातील सामान्य माणसांच्यावतीने तुला प्रार्थना! सत्ता’बदला’साठी तू आशिर्वाद दिला पण आता बदल्याची भाषा थांबावी. राज्याचे उद्योग गुजरातने पळवू नये. युवांच्या नोकरीचा घास हिरावला जाऊ नये. महाराष्ट्राची बदनामी सहन करू नये. वाचाळ मंत्र्यांना तारतम्य यावं…” तर आणखी एक ट्विट करत म्हंटलं आहे, “अतिवृष्टीतील बळीराजाला मदत मिळावी. राज्याची भूमी बळकावण्याची भाषा करणाऱ्यांना धडा मिळावा.. अंधश्रध्दा, तंत्रमंत्र, जादूटोणा याला सरकारने बळी पडू नये. तसंच राज्याचा स्वाभिमान आणि अस्मिता अबाधित रहावी.. हे अडचणींचे ‘डोंगार’ पार करण्यासाठीही जे-जे हवं ते सर्व राज्य सरकारला दे!”असेही आमदार रोहित पवारांच्या  ट्विटमध्‍ये म्‍टहलं आहे. त्‍यांच्‍या या सूचनक ट्विटची  राजकीय वर्तूळात जोरदार चर्चा सुरु आहे.

हेही वाचा

Back to top button