गजानन कीर्तीकर यांची शिवसेना नेतेपदावरुन हकालपट्टी | पुढारी

गजानन कीर्तीकर यांची शिवसेना नेतेपदावरुन हकालपट्टी

पुढारी ऑनलाईन डेस्क : शिवसेना नेते, उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे खासदार आणि स्थानिय लोकाधिकार समितीचे अध्यक्ष गजानन किर्तीकर यांनी शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात प्रवेश केला. गजानन कीर्तीकर यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने ठाकरे गटात केवळ ५ खासदार उरले आहेत. यापूर्वी ठाकरे गटातील १२ खासदारांनी शिंदे गटात प्रवेश केला होता.

दरम्यान यानंतर गजानन कीर्तिकर यांची पक्षविरोधी कारवाया केल्याने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेतेपदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने त्यांची शिवसेना नेतेपदावरून हकालपट्टी करण्यात आली. याबाबतची माहिती शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली आहे.

गजानन कीर्तीकर यांनी आज शिंदे गटात प्रवेश केला. यावेळी ते म्हणाले, आज मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत जात आहे. गेल्या अडीच वर्षात सत्तेत असलेले महाविकास आघाडी सरकार हे ठाकरेंचे होते. मात्र, ते पवारांकडूनचं चालवले जात होते. प्रशासकीय अधिकारी देखील शिवसैनिकांची दखल घेत नव्हते. मी ज्येष्ठ असूनही विनायक राऊत, अरविंद सावंत यांना मोठी पद देण्यात आली. अखेर सर्वांशी चर्चा करून मी एकनाथ शिंदे सोबत जाण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, गजानन कीर्तीकर यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने ठाकरे गटात केवळ ५ खासदार उरले आहेत. यापूर्वी ठाकरे गटातील १२ खासदारांनी शिंदे गटात प्रवेश केला होता.

हेही वाचलंत का?

Back to top button