संजय राऊत यांच्या त्या वक्तव्यावर शहाजी बापू म्हणाले आम्ही शिवसेना वाचवण्यासाठी उचलले पाऊल

पुढारी ऑनलाईन : शिवसेना नेते खासदार संजय राऊत हे कारागृहातून बाहेर आले आहेत. यानंतर त्यांनी बंडखोर आमदाराबद्दल मोठ व्यक्तव्य केले आहे. संजय राऊत म्हणाले की, बंडखोर आमदार शिवसेनेत लवकरच परत येतील. त्यांच्या या वक्तव्यावर अनेक राजकीय प्रतिक्रिया येत आहे.
शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांनीही आपली प्रतिक्रीया दिली आहे. ते म्हणाले, आम्ही सर्वच आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठिशी राहणार आहोत, असे शहाजीबापू पाटील म्हणाले. तर शिवसेना वाचवण्यासाठी भाजपसोबत जाण्याचे हे पाऊल आम्ही सर्वांनी उचलले आहे, असे शहाजीबापू म्हणाले.
पुढे बोलताना ते म्हणाले, एकनाथ शिंदे यांच्या पाठिशी आम्ही खंबीरपणे उभे राहणार आहोत. आम्ही सर्व आमदार, खासदार शेवट पर्यंत सोबत राहणार आहोत. संजय राऊतांनी अडीच वर्षापूर्वी आम्हाला फरफडत नेवून बाळासाहेबांच्या विचारांचा चुराडा केला. त्यांनी जनावरं दावणीला बांधली जातात तसे सर्वांना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या दावणीला बांधले. शिवसेना पक्षाला दाऊदच्या सहकाऱ्यांसोबत घेवून गेले, ज्यांनी अनेक वेळा बाळासाहेब ठाकरे यांचा घात केला होता.
दरम्यान, सर्व आमदारांनी एकनाथ शिंदे यांना हे पाऊल उचलावे असे सांगितले. तसेच यासाठी अनेत दिवस वेळ लागला आहे. आम्ही आमदारांनी जवळपास दोन वर्ष आमचे दु:ख सहन करत नाईलाजाने शिवसेना वाचली पाहिजे म्हणून हे पाऊल उचलले आहे.
हेही वाचा
…मग ही लढाई आम्ही पूर्ण ताकदीने लढू : जितेंद्र आव्हाडांच्या अटकेनंतर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
अकोला: खासदारसाहेब राजीनामा द्या : विदर्भ राज्य आंदोलन समितीची मागणी