बाळासाहेब ठाकरे यांची शपथ घेवून संजय राऊतांनी सांगितले, घोटाळ्याशी माझा… | पुढारी

बाळासाहेब ठाकरे यांची शपथ घेवून संजय राऊतांनी सांगितले, घोटाळ्याशी माझा...

पुढारी ऑनलाईन डेस्क : शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या घरी आज सकाळी (दि. 31) ईडीचे पथक दाखल झाले आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ माजली आहे. याकारवाईनंतर संजय राऊत यांनी ट्विट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, “तरीही शिवसेना सोडणार नाही. महाराष्ट्र आणि शिवसेना लढत राहील. खोटी कारवाई.. खोटे पुरावे.. मी शिवसेना सोडणार नाही.. मरेन पण शरण जाणार नाही. जय महाराष्ट्र! कोणत्याही घोटाळ्याशी माझा काडीमात्र संबंध नाही. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शपथ घेऊन मी हे सांगत आहे.. बाळासाहेबांनी आम्हाला लढायला शिकवलंय.. मी शिवसेनेसाठी लढत राहीन.’ असे म्हटले आहे.

काय आहे नेमके प्रकरण? 

आज सकाळी  शिवसेना संजय राऊत मुंबईतील मैत्री बंगल्यवर  ईडीचे पथक दाखल झाले आहे. पत्राचाळ प्रकरणी त्यांची चौकशी केली जाणार आहे. ईडीसोबत केंद्रीय सुरक्षा रक्षक दलांचे सुरक्षा रक्षक आहेत. पत्राचाळ प्रकरणी संजय राऊत यांना ईडी ने वेळोवेळी चौकशीसाठी हजर राहण्यासाठी समन्स बजावले होते. तरीही त्यांनी त्याला प्रतिसाद दिला नसल्याने ईडीचे अधिकारी आज चौकशीसाठी संजय राऊत यांच्या घरी दाखल झाले आहे. सुत्रांच्या माहितीनुसार पत्राचाळ प्रकरणी हजारो कोटींची हेराफेरी झाली असून हा पैसा थेट संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा यांच्या बँक खात्यात वळवण्यात आल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

हेही वाचलंत का?

Back to top button