तानसा, मोडक सागर ओसंडून वाहण्याच्या मार्गावर | पुढारी

तानसा, मोडक सागर ओसंडून वाहण्याच्या मार्गावर

मुंबई/ठाणे : पुढारी वृत्तसेवा मुसळधार पावसामुळे ठाणे जिल्ह्यातील तानसा व मोडक सागर ही दोन्ही धरणे लवकरच भरून वाहण्याची शक्यता असून, ही दोन्ही धरणे मुंबई महापालिकेची असल्याने मुंबईकरांना ही दिलासा देणारी बातमी आहे.

तानसा व मोडक सागर धरण ओसंडून वाहण्याची पाताळी अनुक्रमे 128.63 मिटर व 163.14 टीएचडी इतकी आहे. मंगळवारी त्यांची पातळी 125.33 मीटर व 161.33 मीटर वर पोहोचली. दोन्ही धरणाखालील तसेच तानसा व वैतरणा नदीलगतच्या शहापूर, भिवंडी, वाडा, वसई व पालघर या तालुक्यातील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

दरम्यान, मुंबईला दररोज 450 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करणारा मोडक सागर तलावातील पाणीसाठा 88 टक्केवर पोहचला आहे. तुळशी तलावातील पाणी साठाही 70 टक्के वर पोहचला आहे. तानसा तलावातील पाणीसाठयातही वाढ होत आहे.

मुंबईला पाणीपुरवठा करणार्‍या अप्पर वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार व तुळसी तलावातील पाणीसाठा नऊ टक्केवर आला होता. तलावात जेमतेम 1 लाख 30 हजार दशलक्ष लिटर पाणीसाठा शिल्लक होता. जुलै महिन्यात चांगला पाऊस झाल्याने 12 जुलै सकाळी 6 वाजेपर्यंत तलावातील पाणीसाठा 7 लाख 28 हजार 286 दशलक्ष लिटरवर पोहचला. 2021 च्या तुलनेत तो 33 टक्के जास्त असल्याचे जल अभियंता विभागाकडून सांगण्यात आले.

हेही वाचा

Back to top button