मुंबईतील कुर्ल्यात चार मजली इमारत कोसळून तिघांचा मृत्‍यू; आदीत्य ठाकरेंची घटनास्थळी भेट    | पुढारी

मुंबईतील कुर्ल्यात चार मजली इमारत कोसळून तिघांचा मृत्‍यू; आदीत्य ठाकरेंची घटनास्थळी भेट   

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : कुर्ला पूर्व शिवसृष्टी रोडवरील वसंतराव नाईक नगर सोसायटीतील मोडकळीस आलेल्या दोन इमारती सोमवारी रात्री ११ च्या सुमारास कोसळल्या. यामध्ये तिघांचा मृत्यू झाला आहे. तर ७ रहिवाशांना बाहेर काढण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले आहे. सोमवारी रात्री उशीरा पर्यावरण मंत्री आदीत्य ठाकरे यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेची माहीती घेतली.

यावेळी स्थानिक नगरसेविका प्रवीणा मोरजकर, माजी नगरसेवक गौतम साबळे तसेच विविध पक्षसंघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. स्थानिक आमदार मंगेश कुडाळकर यांनी दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना 5 लाख तर जखमींना एक लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. आज सकाळपासून पुन्हा ढिगारा उपसण्याचे काम सुरू झाले असून इमारतीत दबलेल्या रहिवाशांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या इमारतीत आणखी २०ते २५ लोक असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

नाईक नगर सोसायटी मधील पाच ईमारती मोडकळीस आल्याने त्या खाली करण्याची नोटीस मुंबई महानगरपालिकेने 6 वर्षांपूर्वीच सोसायटीला दिलेली होती. तरीही नागरीक राहत होते. उर्वरीत 3 धोकादायक ईमारती त्वरीत खाली करून पाडकाम करणे गरजेचे आहे. मुंबई महानगरपालिकेने स्वतःहून या इमारती पाडाव्यात अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.

हेही वाचलंत का ?

Back to top button