Rajysbha Election 2022 : शिवसेनेच्या सुहास कांदे यांचे मत ठरवले बाद; निवडणूक आयोगाचा निर्णय | पुढारी

Rajysbha Election 2022 : शिवसेनेच्या सुहास कांदे यांचे मत ठरवले बाद; निवडणूक आयोगाचा निर्णय

पुढारी ऑनलाई डेस्क : महाराष्ट्रातील राज्यसभेच्या निवडणुकीच्या (Rajysbha Election 2022) स्थगित झालेल्या मतमोजणीला काही वेळात पुन्हा सुरुवात होणार आहे. दरम्यान भाजपने मंत्री जितेंद्र आव्हाड, मंत्री यशोमती ठाकूर, सुहास कांदे या तिघांच्या मतदानावर भाजपने आक्षेप घेतला होता. या आक्षेपानंतर मतमोजणी स्थगित करण्यात आली होती. दरम्यान, रात्री उशिरा निवडणूक आयोगाकडून शिवसेनेच्या सुहास कांदे यांचे मत बाद ठरविण्यात आले आहे. त्यामुळे हा शिवसेनेला मोठा धक्का मानला जात आहे.

महाविकास आघाडीच्या तीन मतांबद्दल भाजपने आक्षेप घेतला होता. त्यानंतर राज्यसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र विधानसभा सदस्यांचे घेण्यात आलेल्या मतदानाची मतमोजणी स्थगित करण्यात आली होती. तसेच आक्षेप घेण्यात आलेल्या मतांवर केंद्रीय निवडणूक आयोगाने निर्णय घेणार होते. निवडणूक आयोगाने मध्यरात्री उशिरा पुन्हा मतमोजणी करण्याचा आदेश दिला आहे. तसेच या मतामध्ये शिवसेनेच्या सुहास कांदेचे मत बाद ठरविण्यात आले आहे.

महाराष्ट्र राज्यसभा निवडणुकीत (Rajysbha Election 2022) गोपनीयतेचा भंग झाल्याचा आरोप निवडणूक आयोगाला भेटून भाजपच्या शिष्टमंडळाने केला होता. महाविकास आघाडीनेही असाच आक्षेप घेतला. त्यावर केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्‍तांनी महाराष्ट्र निवडणूक आयुक्‍तांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली. त्यानंतर तूर्त महाराष्ट्रातील 6 जागांची मतमोजणी स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

मतमोजणी ऐनवेळी स्थगित झाल्याने राजकीय पक्षांतील कार्यकर्त्यांच्या उत्साहावर विरजण पडले. भाजपच्या शिष्टमंडळाने राज्यसभा निवडणूकच रद्द करण्याची मागणी आयोगाकडे केली होती. मंत्री जितेंद्र आव्हाड, मंत्री यशोमती ठाकूर, सुहास कांदे या तिघांच्या मतदानावर भाजपने आक्षेप घेतला होता. यानंतर महाविकास आघाडीने भाजपचे सुधीर मुनगंटीवार, आमदार रवी राणा यांच्या मतदानावर आक्षेप नोंदविला होता. तशी तक्रारही निवडणूक आयोगाकडे केली होती. आयोगाकडून दोघांची बाजू ऐकून घेण्यात आली. मतदान तसेच मतदानोत्तर सीसीटीव्ही फुटेज तसेच व्हिडीओ चित्रणही आयोगाकडून तपासण्यात आले. दरम्यान, रात्री उशिरा मतमोजणी सुरु करण्याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने दिला. तसेच शिवसेनेच्या सुहास कांदे यांचे मत बाद ठरविण्यात आले. त्यामुळे महाआघाडीच्या उमेदवारींच्या निवडीबाबतचे गणित बिघडते का हे पहावे लागणार आहे.

Back to top button