कडाडून विरोध झाल्याने ठाकरे सरकारकडून होळीवरील निर्बंध मागे ! | पुढारी

कडाडून विरोध झाल्याने ठाकरे सरकारकडून होळीवरील निर्बंध मागे !

मुंबई, पुढारी ऑनलाईन: कोरोना महामारीचे प्रमाण महाराष्ट्रात कमी होत आहे. याच पार्श्वभूमीवर कोरोनाचे निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. 17 आणि 18 मार्च रोजी सर्वत्र होळी, धुलिवंदनचा सण साजरा होत आहे. या सणावर राज्‍य सरकारकडून कोणतेही निर्बंध घातले गेलेले नाहीत. परंतु गृहखात्‍याकडून या सणानिमित्‍त काही मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्‍या आहेत. त्‍यामुळे निर्बंधाशिवाय होळी साजरी येईल.

होळीची लगबग सर्वत्र सुरु आहे. यामध्ये कोरोनाचे निर्बंध कमी केले आहेत. यातच राज्य सरकारने नवी नियमावली जारी केली आहे. सध्या देशात कोरोना पूर्णपणे संपलेला नाही. त्‍यामूळे मास्क वापरणे बंधनकारक आहे, तसेच सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे गरजेचे आहे. या होळी आणि धुळवड सणा निमित्ताने गृहखात्याने नवी नियमावली जारी केली आहे.

 गृहखात्याकडून मार्गदर्शक सूचना व नवी नियमावली

  • गर्दी न करता कोरोना वर्तणुक नियमांचे पालन करावे.
  • विविध रंग, पाणी टाकणे, एकमेकांना गुलाल लावणे, तसेच अनेक रंगाची उधळण होते. परंतु यंदाची होळी ही साधेपणाने करण्यात यावी.
  • या सणानिमित्‍त कोकणात पालखीची मिरवणूक काढण्यात येते. परंतु पालखी घरोघरी घेवून जाता येणार नाहीत. तर स्थानिक प्रशासनाने याबाबत उपाययोजना कराव्यात. त्‍याचबरोबर गर्दी होवू नये यासाठी कोरोना नियमांचे पालन होईल याची योग्य ती दक्षता घ्यावी.
  • कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण तसेच महानगरपालिका, पोलीस प्रशासन, स्थानिक प्रशासनस जारी केलेल्या नियमांचे पालन करणे.
  • मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे गरजेचे आहे.

हेही वाचा

Back to top button