भाजपचे ‘ते’ साडेतीन नेते कोण?, संजय राऊत म्‍हणाले,… | पुढारी

भाजपचे 'ते' साडेतीन नेते कोण?, संजय राऊत म्‍हणाले,...

पुढारी ऑनलाईन डेस्‍क
शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेमध्‍ये भाजप नेत्‍यांवर हल्‍लाबोल केला. या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी सांगितलेल्‍या भाजपच्‍या साडेतीन नेत्‍यांची नावे जाहीर हाेणार का? याबाबत सर्वांनाच उत्‍सुकता हाेती. मात्र त्‍यांनी भाजपमधील या साडेतीन नेत्‍यांची नावे पत्रकार परिषदेत जाहीर केलीच नाहीत.

याबाबत पत्रकार परिषद झाल्‍यानंतर बोलताना संजय राऊत म्‍हणाले की, तुम्‍हाला उद्‍यापासून कळेल की, भाजपचे ते साडेतीन नेते कोण आहेत ते. शिवसेना कधीही झुकणार नाही, असेही त्‍यांनी यावेळी सांगितले.

आज शिवसेनेच्‍या बहुचर्चित पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी भाजपच्‍या नेत्‍यांवर विविध आरोप केले. ते म्‍हणाले, भाजपचे प्रमुख नेते मला भेटले. त्‍यांनी मला हे सांगण्‍याचा प्रयत्‍न केला की, तुम्‍ही या सरकारमधून बाहेर पडा. आम्‍हाला हे सरकार घालवायचे आहे. काही आमदार आमच्‍या हाताशी लागत आहेत. तुम्‍ही आमचे सरकार येण्‍यासाठी मदत करा. तुम्‍ही मदत केली नाही तर केंद्रीय तपास यंत्रणा तुम्‍हाला टाईट करतील, अशी धमकी मला दिला. तुम्‍हाला पश्‍चाताप होईल, अशी धमकी भाजप नेत्‍यांनी मला दिली.

मदत केली नाही तर राज्‍यात राष्‍ट्रपती राजवट लागू करु, अशी धमकी भाजपच्‍या नेत्‍यांनी मला दिली. मराठी भाषेला विरोध करणारे किरीट सोमय्‍या हे भाजपचे फ्रंटमॅन आहे. ते शिवसेनेच्‍या नेत्‍यांवर खोटे आरोप करीत आहेत. गुजरातमध्‍ये २५ हजार कोटींचा घोटाळा झाला. गेली दोन वर्ष हा घोटाळा सुरु होता तेथे कारवाई का केली नाही, असा सवालही त्‍यांनी केला.

हेही वाचलं का?

 

Back to top button