मुंबई -अहमदाबाद तेजस एक्सप्रेस आठवड्यातून तीन वेळाच धावणार | पुढारी

मुंबई -अहमदाबाद तेजस एक्सप्रेस आठवड्यातून तीन वेळाच धावणार

मुंबई : पुढारी वृत्तसेवा

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मुंबई – अहमदाबाद तेजस एक्सप्रेसच्या फेऱ्यामध्ये कपात करण्याचा निर्णय भारतीय रेल्वे कॅटरिंग आणि टुरिझम महामंडळाने घेतला आहे. १२ जानेवारी ते १० फेब्रुवारी दरम्यान आठवड्यातून तीन वेळा तेजस एक्सप्रेस धावणार आहे. तर ११ फेब्रुवारीपासून आठवड्यतून पाच दिवस चालविण्यात येणार आहे.

रत्नागिरी : कॉलेज आवारात घुसले दोन अजगर!

उद्यापासून तेजस एक्सप्रेस शुक्रवार, शनिवार आणि रविवारी ही गाडी धावणार आहे. बुधवार आणि सोमवारची फेरी रद्द केली आहे. जानेवारी महिन्यात १४, १५, १६, २१, २२, २३, २८, २९, ३० आणि फेब्रुवारीत ४, ५, ६ तारखेला तेजस एक्सप्रेस धावणार आहे.

सातारा : ऊस वाहतूक वाहनांना जीपीएस प्रणाली

११ फेब्रुवारीपासून आठवड्यातून ५ दिवस चालविण्यात येणार आहे. रद्द केलेल्या ट्रेनमधील सर्व प्रवाशांना सिस्टमद्वारे एक एसएमएस पाठवला जाईल. तसेच बॅक-एंड टीमद्वारे एक ईमेल पाठवला जाणार आहे.

हेही वाचलं का? 

Back to top button