Raphael aircraft : अंतिम ताफ्यातील तीन राफेल विमाने लवकरच हाेणार हवाई दलात सामील | पुढारी

Raphael aircraft : अंतिम ताफ्यातील तीन राफेल विमाने लवकरच हाेणार हवाई दलात सामील

नवी दिल्‍ली : पुढारी वृत्तसेवा
अत्याधुनिक राफेल लढाऊ विमानांचा ( Raphael aircraft ) शेवटचा ताफा फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हवाई दलाच्या सेवेत सामील होणार आहे. साधारणतः 1 किंवा 2 फेब्रुवारीला अंतिम ताफ्यातील तीन लढाऊ विमाने फ्रान्सहून भारतात येतील, अशी माहिती सूत्रांनी दिली. फ्रान्सहून 36 लढाऊ विमाने खरेदी करण्यासाठी सरकारने करार केला होता. त्यानुसार हा सौदा शेवटच्या टप्प्यात आहे.

भारतीय परिस्थितीची गरज लक्षात घेऊन अंतिम विमानांमध्ये आवश्यक ते बदल करण्यात आलेले आहेत. कोणत्याही स्थितीत लढण्यासाठी सज्ज राहतील, असे बदल या विमानांमध्ये करण्यात आलेले आहेत. 1 किंवा 2 तारखेला ही विमाने दक्षिण फ्रान्समधील इस्ट्रेस – ली ट्यूब एअर बेसवरून उड्डाण घेतील. त्यानंतर काही तासात त्याचे भारतात आगमन होईल. ही विमाने प्राप्त झाल्यानंतर भारताला 35 विमाने मिळतील. शेवटचे राफेल विमान ( Raphael aircraft ) एप्रिल महिन्यात भारतात येणार आहे. शेवटी जे विमान येणार आहे, तेच भारतीय लढाऊ वैमानिकांच्या प्रशिक्षणासाठी वापरण्यात आले होते.

हेही वाचलं का? 

Back to top button