परभणी: मिरखेल- माळटेकडी लोहमार्गावर विद्युत रेल्वेची चाचणी यशस्वी | पुढारी

परभणी: मिरखेल- माळटेकडी लोहमार्गावर विद्युत रेल्वेची चाचणी यशस्वी

आनंद ढोणे

पूर्णा: अकोला-पू्र्णा, परळी-नांदेड, संभाजीनगर-परभणी या रेल्वे लोहमार्गावरील विद्यूत खांब व तारा जोडणीचे काम पूर्ण झाले आहे.     मिरखेल ते माळटेकडी नांदेड रेल्वे स्टेशन या सुमारे ४५ किमी लोहमार्गावर विद्युतवरील रेल्वे इंजिनची सीआरएस चाचणी घेण्यात आली.  दक्षिण मध्य रेल्वेच्या प्रिंसीपल ऑफ चिफ इलेक्ट्रिकल इंजिनियर मिश्रा पी. डी यांच्या विशेष उपस्थितीत ही चाचणी घेण्यात आली.

 यावेळी पहिल्या विद्युत रेल्वे इंजिनचे चालक प्रदिप कुमार, गार्ड अरुणकुमार यांचा सत्कार करण्यात आला.  मिरखेलचे स्टेशनमास्तर अख्तर पाशा यांनी हिरवी झेंडी दाखवून‌ विद्यूत रेल्वेची रवानगी केली.

या प्रसंगी मिरखेल स्टेशनवरुन दोन रेल्वे इंजिन असणारी आठ डब्यांची विशेष गाडी सोडण्यात आली. दक्षिण मध्य रेल्वेच्या सिंकदरा बाद मुख्य विभाग आणि नांदेड रेल्वे विभागातील सुमारे ९२४ किमी लोहमार्गावरील विद्यूतीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. मुदखेड-परभणी लोहमार्गावर गुरुवारी विद्युतीकरण कामाची पाहणी करत विद्यूत रेल्वेची सीआरएस चाचणी घेतली. २५ हजार व्होल्टचा विद्युतप्रवाह असलेल्या वाहिनीवरून रेल्वे धावणार आहे. लवकरच नियमितपणे विजेवरील रेल्वेगाड्या सुरु होण्याची शक्यता वर्तविली

 यावेळी सिंकदराबाद येथील प्रिंसीपल ऑफ चिफ इलेक्ट्रिकल इंजिनियर मिश्रा पी.डी, आर. के. मिना,  नांदेडचे सहा.विभागीय व्यवस्थापक विवेकानंद यल्लपा,  सहायक परिचालन व्यवस्थापक विनोद साठे आदी अधिकारी होते.

हेही वाचा 

Back to top button