

ताडकळस; पुढारी वृत्तसेवा येथील माजलगाव ते नांदेड राज्य महामार्गावर लागुन असलेल्या ताडकळस ता. पुर्णा येथील नवा मोढा बाजार समिती परिसरात व्यापारी गणेश कवटेकवार यांचे राधा ट्रेडर्स हे दुकान आहे. या दुकानाला दि 23 मार्च रोजी रात्री 11 ते 12 वाजण्याच्या दरम्यान शॉर्ट सर्किटने भीषण आग लागली. या दुर्घटणेत लाखो रुपयांचे दुकानातील साहित्य जळुन खाक झाले. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
लागलेली आग एवढी भयानक होती की, सुरूवातीला स्थानिक नागरिकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला, परंतु आग आटोक्यात न आल्याने शेवटी परभणी व पुर्णा येथील अग्नीशामक दलाच्या गाडीला पाच्यारन करण्यात आले. ही आगीची झळ आजुबाजुच्या दुकानांनाही पोहोचली, परंतु तोपर्यंत अग्नीशामकदलाची गाडी पोहचल्यामुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. ही आग आटोक्यात आली नसती तर संपूर्ण कॉम्पलेक्स मधील दुकाने जळुन खाक झाली असती परंतु रांधा टेडर्स मधील सर्व साहित्य जळून खाक झाले.
या बाबत सदरील दुकानदार गणेश कवटेकवार यांच्याशी मोबाईलवर संपर्क करुन आग कशी लागली अशी माहिती फोनवर घेतली असता, शॉर्टसर्किटने आग लागली असे त्यांनी सांगितले. आपल्या दुकानातील आर्थिक नुकसान किती आहे, या बाबत माहिती घेतली असता 95 लाख ते 1 कोटींच्या जवळपास नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले. दुकानात काहीच शिल्लक राहिले नाही संपुर्ण जळुन खाक झाले आहे. दुकानदाराचे मोठे आर्थिक नुकसान झाल्यामुळे त्यांच्या समोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे.
हेही वाचा :